Zeenat Aman: ७३ वर्षीय झीनत अमान यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात अॅडमिट, फोटो पोस्ट करत म्हणाल्या...
Saam TV April 26, 2025 06:45 PM

zeenat aman hospitalize: ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याची माहिती शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावर सक्रिय नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली होती. मात्र, आता त्यांनी स्वतःच त्यांच्या प्रकृतीबाबत खुलासा करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले केले की, गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, त्यांची प्रकृती आता सुधारत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या विश्रांती घेत आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांचे आणि प्रियजनांचे आभार मानले आहेत, ज्यांनी त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या पोस्टमध्ये झीनत अमान यांनी वरून दूर राहण्याचे कारणही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, सध्या त्या त्यांच्या आरोग्यावर लक्ष द्यायचे आहे आणि त्यामुळेच त्यांनी सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला. त्यांना चाहत्यांसोबत संवाद साधण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी काही वेळ लागेल. त्यांच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

७० आणि ८०च्या दशकातील बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या झीनत अमान यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. वयाच्या ७०व्या वर्षीही त्या त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.