श्री गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथीला विविध कार्यक्रम
esakal April 27, 2025 11:45 PM

देहू, ता. २७ : संत शिरोमणी श्री गोरोबाकाका यांच्या ७०८ व्या पुण्यतिथीनिमित्त देहू येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
संत श्री गोरोबाकाका धर्मशाळेमध्ये पहाटे अभिषेक झाला, त्यानंतर सद्गुरू भजनी मंडळाचे भजन झाले. दहा ते बारा या वेळेत संतोष महाराज काळोखे यांचे कीर्तन झाले. भाविकांनी नामगजर करत पुष्पवृष्टी केली. यानंतर आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संत श्री तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त वैभव महाराज मोरे, सुनील महाराज मोरे, अशोक महाराज मोरे, गुलाब काळोखे, दादाभाऊ गावडे, मुकुंद महाराज मोरे, पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे संतोष कुंभार, कुंभार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर, समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष बाबाजी कुंभार, भगवानराव कुंभार, स्वप्नील कुंभार, तानाजी दरेकर, रामचंद्र हाडशीकर, बाळासाहेब कुंभार, जयवंत कुंभार, पांडुरंग दरेकर, सुधीर कुंभार, मनोहर भालेराव, अनिकेत कुंभार, संत गोरोबाकाका धर्मशाळेचे व्यवस्थापक लिपने महाराज यांच्यासह भाविक उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. विकास कंद यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संत शिरोमणी गोरोबाकाका सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.