भारताचा माजी क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. १४ वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा करत असल्याची सोशल मीडिया पोस्ट त्याने केली. त्यानंतर क्रिकेटविश्वातून त्याच्या निवृत्तीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
आजी-माजी क्रिकेटपटूंसह अनेक चाहत्यांनीही त्याने लवकर निवृत्ती घेतल्याचे म्हटले. त्याने आणखी काही काळ खेळायला हवं होतं, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, सोमवारी निवृत्तीच्या घोषणेनंतर मुंबई विमानतळावर पत्नी अनुष्कासह स्पॉट झाला होता. त्यानंतर मंगळवारी ते दोघे उत्तरप्रदेशमधील वृंदावन धाममध्ये स्वामी प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे समोर आले. त्यांचे तेथील व्हिडिओही व्हायरल झाले.
त्यांनंतर मंगळवारी ते दोघे पुन्हा मुंबईत परतले. यावेळी त्यांना पॅपाराझींनी घेरलं होतं. यावेळी कोणीतरी त्याला असंही म्हटलं की 'आता तू निवृत्त झाला आहेस, तर आम्ही कसोटी बघणार नाही.' त्यावर विराटने काहीसं आश्चर्य व्यक्त करताना 'हा, अरे', अशी प्रतिक्रिया दिली.
त्यानंतर त्याला अनेकांनी फोटोसाठी विनंती केल्याचे दिसले. यावेळी त्याने सांगितले की तो बंगळुरूला आयपीएल २०२५ साठी परत जाणार आहे. त्यावेळी तो फोटो देईल. या घटनेचा होत आहे.
विराटने कसोटीपूर्वीच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण असे असले तरी तो वनडे आणि आयपीएलमध्ये सक्रिय आहे. तो आता स्थगित झालेली आयपीएल १७ मे पासून पुन्हा सुरू झाली की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. तो आयपीएलमध्ये दमदार फॉर्ममध्येही आहे. त्याने ११ सामन्यांत ५०० हून अधिक धावाही केल्या आहेत.
विराटची कसोटी कारकिर्दकसोटी क्रिकेटमध्ये २०११ साली पदार्पण केलेल्या विराट कोहलीने १२३ कसोटी सामने खेळताना ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली. त्याने ६८ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना ४० विजय मिळवले, तर १७ पराभव स्वीकारले आणि ११ सामने अनिर्णित राहिले.