क्षणार्धात जाणून घ्या बोअरवेल भूजल पातळी
esakal May 16, 2025 01:45 AM

भारत सरकारनेही दखल घेतलेले ‘भूजल अॅप’ हे मोबाईल अॅप अवघ्या मिनिटभरामध्ये बोअरवेलमधील भूजल पातळी मोजू शकते. यासाठी बोअरला कोणतेही यंत्र जोडण्याची गरज नाही किंवा बोअर उघडावे लागत नाही. या अॅपचा वापर कसा करायचा, त्याचा भूजल व्यवसथापनासह शेतीची जलसुरक्षा निश्चितीसाठी कसा लाभ होतो, हे जाणून घेण्यासाठी १७ मे रोजी ऑनलाइन कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये पाणी शाश्वतपणे कसं वापरावं, उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळून पीक कसं वाचवावं, उत्पादन वाढवण्यासाठी पाण्याचा योग्य उपयोग कसा करावा, वीज व पाण्याची बचत करून खर्च कसा कमी करावा आणि जनावरांसाठी किंवा आपत्कालीन गरजेसाठी पाणी कसं राखून ठेवावं याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. शेतात बोअरवेलचा वापर करणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ९१५६०१०००६

‘एफपीओ’साठी कायदेशीर अनुपालन आणि व्यवस्थापन प्रशिक्षण
दरवर्षी हजारो शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) कायदेशीर अटींचे पालन न केल्यामुळे मोठ्या आर्थिक दंडाचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर ‘एफपीओ’मध्ये नॉन-कम्प्लायंस कमी करण्यासाठी २४ मे रोजी ऑनलाइन कार्यशाळा आयोजिली आहे. कार्यशाळेत एफपीओंना कायदेशीर चौकट, नियामक आवश्यकता, वित्तीय व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धती, पारदर्शकतेसाठी रेकॉर्ड ठेवणे, प्राप्तिकर, वस्तू व सेवा कर आणि इतर कायदेशीर जबाबदाऱ्या तसेच लेखा परीक्षण, देखरेख आणि अहवाल या सर्व बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. एफपीओ संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल आणि संबंधित सभासद यांच्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार असून नियमांचे काटेकोर पालन, योग्य नियोजन आणि डिजिटल साधनांचा प्रभावी वापर यामुळे कंपन्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल आणि एफपीओंच्या आर्थिक स्थैर्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
संपर्क : ९१३००१७९२०, ८९५६७१२६३१

शेतीतील उद्योजकता विकास आणि संधी याबाबत विनामूल्य वेबिनार
कृषी क्षेत्रातील उद्योजकता आणि अॅग्री-बिझनेस कौशल्यावर आधारित विनामूल्य वेबिनार २४ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत झूम प्लॅटफॉर्मवर आयोजिला आहे. कृषी व्यवसायातील सध्याच्या आणि भविष्यातील संधींवर आधारित विविध विषयांची चर्चा या वेळी होणार आहे. वेबिनारमध्ये शेती निर्यात आणि आयात, व्यवसाय संचालन, वित्त व्यवस्थापन, अन्न व कृषी स्टार्टअप्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, रोबोटिक्स, प्रिसिजन शेती यासारख्या तंत्रज्ञानांचा उपयोग, डिजिटल साधने, अन्न प्रक्रिया व पॅकेजिंग, मानव संसाधन व्यवस्थापन, ई-मार्केटप्लेस, डिजिटल मार्केटिंग आणि पुरवठा साखळी यावर सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच उत्पादन मार्केट सर्व्हे, ब्रँडिंग, ग्राहक संबंध व्यवस्थापन, व्यवसाय नियम आणि अनुपालन यासारख्या महत्त्वाच्या बाबींवरही चर्चा होणार आहे. हा वेबिनार विद्यार्थी, उद्योजक, नोकरी शोधणारे आणि अॅग्री-टेकमध्ये रस असणारे यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१

‘महारेरा’ परीक्षा पोर्टल फेज सातच्या अंतिम मुदतीत वाढ
फेज सातसाठी महारेरा परीक्षा पोर्टल, जे पूर्वी १४ मे रोजी रात्री ११ वाजता बंद होणार होते, त्याची मुदत आता १८ मे रोजी रात्री ११ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे उमेदवारांना परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी आणि शेवटच्या क्षणाच्या ताणाशिवाय त्यांची तयारी पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. अद्यापही अनिवार्य असलेले महारेरा सक्षमता प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचे प्रशिक्षण सर्व स्थावर संपदा अभिकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातील विकसकांकडे स्थावर संपदा व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले नसेल, तर ते करण्याची आणि वेळेवर परीक्षेसाठी अर्ज करण्याची ही उत्तम वाढीव संधी उपलब्ध झाली आहे. डिसेंबर २०२४ नंतर २०२५ या वर्षात प्रथमच पोर्टल खुले झाले असून पुढे लवकर पोर्टल खुले होण्याची शक्यता कमी असल्याने प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेस सामोरे जाण्याची ही शेवटची संधी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.