भिंती या घराच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या भिंतींची सजावट केल्यास संपूर्ण घराचा लूक बदलू शकतो. वॉल हँगिंगचा वापर, वॉलपेपर, वॉल आर्ट अशा अनेक गोष्टींचा वापर करून तुम्ही भिंती सुंदर बनवू शकता. भिंतींची सजावट तुम्ही वेळोवेळी बदलू शकता.
भिंत सजवण्यासाठी खूप मोठा खर्च करण्याची गरज नसते, नावीन्यपूर्ण कल्पना आणि उत्साह एवढ्या दोनच गोष्टींचा वापर करून तुम्ही भिंतींनी नवीन रूप देऊ शकता. काही सोप्या टिप्स बघू, ज्या तुमच्या भिंतींना नवीन लूक देण्यास मदत करतील.
पेंटिंग्ज आणि आर्टवर्क
मोठ्या कॅनव्हास पेंटिंगमुळे भिंतीला फोकस मिळतो, खोलीला डेप्थ मिळते आणि संपूर्ण खोलीचा लूक बदलतो.
समकालीन कला, परंपरागत चित्रे किंवा फोटो प्रिंट्स वापरा.
गॅलरी वॉल स्टाइलमध्ये छोट्या छोट्या फ्रेम्स एकत्र लावू शकता.
आरसे
फार कमी लोक सजावटीसाठी आरशांचा वापर करतात. पण त्यांचा कल्पकपणे वापर करता येतो. आरसा लावल्यास खोली मोठी आणि उजळ दिसते.
डेकोरेटिव्ह फ्रेम्स असलेले आरसे अधिक स्टायलिश दिसतात.
वॉल शेल्फ्स
ओपन शेल्फ्सचा वापर करा आणि त्यात पुस्तके, स्मॉल डेकोर आयटम्स ठेवा.
वॉल शेल्फमळे स्टोरेज आणि सजावट दोन्हीचा फायदा मिळतो.
वॉल माउंटेड कुंड्या
भिंतीलगत वाढणाऱ्या झाडांचा वापरकरून किंवा भिंतीवरच कुंड्या माऊंट करून भिंतींना अक्षरशः हरित बनवता येते.
क्लॉक्स आणि वॉल डेकोर
केवळ एक घड्याळ पूर्ण रूमचे व्यक्तिमत्त्व बदलू शकते. भिंतीची सजावट पारंपरिक पद्धतीची असेल तर पारंपरिक घड्याळांचा वापर पूरक ठरतो. हल्ली ऑनलाइन खूप कल्पक घड्याळे उपलब्ध आहेत. ती मागवून भिंतीवर लावू शकता.
वॉल डेकोरमुळे भिंत समृद्ध दिसते. तुम्ही अनेक प्रयोग करू शकता. लाकडी फ्रेमपासून सिरॅमिकपर्यंतच्या अनेक गोष्टींचा वापर करून तयार केलेले वॉल आर्ट बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा छान वापर तुम्ही करू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा
रूमचा आकार आणि प्रकाश
छोट्या खोल्यांमध्ये हलके रंग आणि मिरर्स वापरा.
मोठ्या भिंतीवर मोठे आर्टवर्क किंवा कोलाज स्टाइल लावा.
फर्निचरशी सुसंगतता
खोलीतले फर्निचर पॅटर्न्सने भरलेले असेल, तर साधे वॉल आर्ट निवडा.
मिनिमलिस्ट फर्निचर असल्यास, बोल्ड आणि रंगीबेरंगी पेंटिंग्ज वापरा.
थीम आणि रंगसंगती
मॉडर्न इंटिरियरसाठी जिऑमेट्रिक डिझाइन्स.
ट्रॅडिशनल स्टाइलसाठी वूडन फ्रेम्स किंवा हँडपेंटेड आर्ट.
वॉल हँगिंग लावण्यासाठी टिप्स
उंची आदर्श हवी : पेंटिंग्ज/आरसे डोळ्यांच्या लेवलवर (भिंतीच्या मध्यभागी) लावा.
समतोल राखा : एका भिंतीवर फक्त एक मोठा आयटम लावा किंवा ग्रुप असल्यास ते सम क्रमांकात असतील याची काळजी घ्या.
स्पेसिंग : एकापेक्षा जास्त फोटो फ्रेम्स लावताना दोन-तीन इंच अंतर ठेवा. इतरही वॉल हँगिंग्ज किंवा वॉल आर्टमध्येही योग्य अंतर ठेवण्याचे भान ठेवा.
कमी खर्चाचे पर्याय
डीआयवाय वॉल आर्ट : फॅब्रिक, पेपर कटआउट्स किंवा वुडन पॅलेट्स वापरून स्वतःचे डेकोर तयार करा.
वॉल स्टिकर्स : स्टायलिश कोटिंग्ज सहज लावता येतात आणि काढून टाकता येतात.
फोटो गॅलरी : कुटुंबातल्या सदस्यांच्या स्टायलिश फोटोंचा कोलाज करून सजावटीला भावनिक स्पर्श तुम्ही देऊ शकता.
योग्य वॉल डेकॉर निवडल्यास तुमच्या घराला एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक लुक मिळू शकतो. थोड्या प्रयत्नांनी तुमच्या भिंती केवळ सजावटीच नाहीत, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब बनू शकतात!