पिंपरी - कुठल्या विद्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणत्या विद्या शाखेमधून करिअरसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का? मग, एम्पायर इस्टेट येथील रागा पॅलेसमध्ये ३१ मे आणि १ जून रोजी आयोजित ‘सकाळ’ विद्या एज्युकेशन एक्स्पोला नक्की भेट द्या. येथे एकाच छताखाली विद्यार्थ्यांना करिअरबाबत सर्व मार्गदर्शन मिळणार आहे.
दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना वेध लागले आहेत ते महाविद्यालयीन शिक्षण आणि करिअरची दिशा ठरविण्याचे. मात्र, अशा वेळी उत्तम महाविद्यालय निवडण्यासाठी, करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते.
हेच लक्षात घेऊन ‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार आहे. करिअरबाबतचे सर्व मार्गदर्शन येथे एकाच छताखाली मिळणार आहे.
या प्रदर्शनासाठी पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी हे प्रायोजक, एमआयटी एसीएस एओई, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी पिंपरी हे सहप्रायोजक आहेत. या प्रदर्शनात पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती आणि मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. एकाच ठिकाणी महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध पर्यायांची सर्व माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, इंटिरियर डिझाइन यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन त्यात असणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यासह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था सहभागी असतील.
एक्स्पोबाबत...
केव्हा : ३१ मे आणि १ जूनला
कुठे : रागा पॅलेस, चिंचवड-एम्पायर इस्टेट
कधी : सकाळी १० ते रात्री ८
अधिक माहितीसाठी संपर्क : शिवम साळुंके ः ९३०७७१५९०३
आज सकाळी ११ वाजता उद्घाटन
‘सकाळ विद्या एक्स्पो’चे उद्घाटन शनिवारी (ता.३१) सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई हे प्रमुख पाहुणे असतील.
मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी आम्ही जागतिक दर्जाचे शिक्षण देत आहोत. विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती निर्माण करत असतो. त्याची माहिती ‘सकाळ विद्या एक्स्पो’च्या माध्यमातून मिळणार आहे. कारण, दर्जेदार शिक्षणाची दूरदृष्टी ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम आम्ही करत आहोत.
- डॉ. धनंजय वर्णेकर, संस्थापक अध्यक्ष, ‘आयआयबीएम’ ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट