RCB vs PBKS IPL Final Live: 6, wd,6,1,wd,6,wd,W,1.... एकाच षटकात २३ धावा अन् विकेट; जितेश शर्मा-लिव्हिंगस्टोनने जेमिसनला धुतलं
esakal June 04, 2025 04:45 AM
6, wd,6,1,wd,6,wd,W,1.... एकाच षटकात २३ धावा अन् विकेट; जितेश शर्मा-लिव्हिंगस्टोनने जेमिसनला धुतलं

विराटच्या विकेटनंतर जितेश शर्माने फलंदाजीला येत आक्रमक खेळ केला, त्याला लिव्हिंगस्टोनचीही साथ मिळाली. जेमिसनच्या विरुद्ध या दोघांनी १७ व्या षटकात २३ धावा चोपल्या. पण अखेर पाचव्या षटकात लिव्हिंगस्टोन फुलटॉस खेळण्यात चुकला. त्याला जेमिसनने पायचीत केले. या षटकात ६, वाईड,६,१,वाईड,६, वाईड, विकेट, १ अशा मिळून २३ धावा निघाल्या.

Virat Kohli Wicket: विराट कोहलीचं अर्धशतक हुकलं; उमरझाईने घेतला अफलातून कॅचबंग

बंगळुरूचा डाव एका बाजूने सलामीला खेळायला आलेल्या विराटने सांभाळला होता. त्याने संयमी खेळताना धावफलक हलता राहिल याची काळजी घेतली होती. पण १४ व्या षटकात त्याने आक्रमक पवित्रा घेतला. परंतु, १५ व्या षटकात अझमत उमरझाई गोलंदाजीसाठी आला. त्याच्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने पुलशॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि उंच उडाला. उमरझाईने चपळाईने पुढे जात विराटचा अफलातून झेल घेतला. त्यामुळे विराटला ३५ चेंडूत ३ चौकारांसह ४३ धावांवर माघारी परतावे लागले. १५ षटकात बंगळुरूने ४ बाद १३४ धावा केल्या आहेत.

Rishi Sunak Live: ऋषी सुनक स्टेडियममध्ये दाखल

युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक त्यांच्या पत्नीसह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत.

RCB vs PBKS Final Live: बंगळुरूचा कर्णधारही परतला माघारी! जेमिसनने दिला तिसरा धक्का

काईल जेमिसन पंजाबसाठी अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याला ११ व्या षटकात गोलंदाजीसाठी श्रेयसने आणले. त्यावेळी बंगळुरूचा कर्णधार रजत पाटिदार आणि विराट डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. पण पाचव्या चेंडूवर रजतला जेमिसनने पायचीत केले. रजतने १६ चेंडूत २६ धावा केल्या. ११ षटकात बंगळुरुच्या ३ बाद ९७ धावा झाल्या आहेत.

RCB vs PBKS Final Live: युझी चहलच्या फिरकीत अडकला अग्रवाल; बंगळुरूला दुसरा धक्का

पॉवरप्लेनंतर ७ व्या षटकात गोलंदाजीसाठी श्रेयसने युझवेंद्र चहलकडे चेंडू सोपवला. त्यानेही हा विश्वास राखताना दुसऱ्याच चेंडूवर त्याच्या फिरकीत मयंक अग्रवालला अडकवले. अग्रवालचा झेल डीपमध्ये अर्शदीप सिंगने घेतला. अग्रवालने १८ चेंडूत २४ धावा केल्या.

RCB vs PBKS Final Live: बंगळुरूच्या पॉवर-प्लेमध्ये ५० धावा पार

बंगळुरूने पॉवर-प्लेच्या ६ षटकांमध्ये आक्रमक खेळताना ५० धावा पार केल्या आहेत. ६ षटकात बंगळुरूच्या १ बाद ५५ धावा झाल्या. विराट १३ धावांवर आणि मयंक अग्रवाल २४ धावांवर नाबाद आहे.

IPL 2025 Final Live: बंगळुरूला पहिला धक्का! आक्रमक खेळणाऱ्या सलामीवीराचा श्रेयसने घेतला अप्रतिम झेल

अंतिम सामन्याला निर्धारिक वेळेत सुरुवात झाली आहे. या सामन्यात बंगळुरूकडून सलामीला विराट कोहली आणि फिल सॉल्ट उतरले होते. सॉल्टने आक्रमक खेळही केला. पण दुसऱ्या षटकात विराट कोहलीसमोर श्रेयस अय्यरने काइल जेमिसनला गोलंदाजीला आणले आणि विराटने मोठ्या चतुराईने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली.

सॉल्टने मिड ऑनच्या डोक्यावरून चौकार खेचला, परंतु चौथ्या चेंडूवर तशाच प्रयत्नात सॉल्टने विकेट फेकली. उत्तुंग उडालेला चेंडू श्रेयसने अचूक टिपला अन् सॉल्ट ९ चेंडूंत १६ धावांवर माघारी परतला.

RCB vs PBKS Final, Playing XIपंजाब किंग्सने टॉस जिंकला; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हन -

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे इम्पॅक्ट सब्स्टिट्यूटसाठी पर्याय - रसिक सलाम, मनोज भंडागे, टिम सेफर्ट, स्वप्नील सिंग, सुयश शर्मा.

पंजाब किंग्सचे इम्पॅक्ट सब्स्टिट्यूटसाठी पर्याय - प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, हरप्रीत ब्रार

RCB vs PBKS IPL Final Live: अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभाला सुरुवात; भारतीय सैन्यदलाचा गौरव

अंतिम सामन्यापूर्वी आयपीएल २०२५ स्पर्धेच्या समारोप समारंभाला सुरुवात झाली असून सोहळ्यात भारतीय सैन्यदलाचा सन्मान करण्यात येत आहे. यावेळी देशभक्तीपर गीतांवर परफॉर्मन्स झाले.

IPL 2025 Final: अहमदाबादमध्ये चाहत्यांची गर्दी होण्यास सुरुवात

अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना पाहाण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

IPL 2025 Closing Ceremony: समारोप सोहळ्यात भारतीय सैन्यदलांचा होणार गौरव

बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की आयपीएल 2025 चा समारोप समारंभ भारतीय सैन्यदलांना समर्पित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशस्वी कारवाईसाठी भारतीय सैन्यदलांचा गौरव केला जाईल.

अंतिम सामन्यासाठी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांना बीसीसीआयकडून निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्यात सैन्यदलांचे बँड सादरीकरण आणि देशभक्तीपर गीते सादर केली जाणार आहेत.

IPL 2025: यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनकही लावणार अंतिम सामन्यासाठी हजेरी

युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यांनी म्हटलं आहे की 'आयपीएलने क्रिकेटमध्ये बदल घडवला आहे. मला वाटतं कुठेही असलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूला आयपीएलमध्ये कधीतरी खेळण्याची इच्छा असते.'

IPL 2025 Final: अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात

अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सामन्यावेळी पावसाचा अडथळा आला, तर अंतिम सामन्यासाठी उद्याचा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर राखीव दिवशीही सामना नाही झाला, तर काय होईल हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक पाहा.

IPL 2025 Closing Ceremony: कधी सुरु होणार समारोप सोहळा

आज आयपीएल २०२५ स्पर्धेचा समारोप सोहळा नाणेफेक होण्यापूर्वी संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. हा सोहळा नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होईल.

RCB vs PBKS Final: कुठे आणि किती वाजता सुरू होणार फायनल?

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा हा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम देखील आहे. या अंतिम सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी ७ वाजता नाणेफेक होईल.

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेची आज (३ जून) सांगता होणार आहे. आत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स संघात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ चा विजेताही आज मिळेले.या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकलेलं नसल्याने आयपीएलला आज नवा विजेता मिळणार हे निश्चित आहे.

पंजाब आणि बंगळुरू हे आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम संघ देखील आहेत. पंजाबने २०१४ नंतर अंतिम सामना गाठला आहे, तर बंगळुरूने २०१६ नंतर अंतिम सामना गाठला आहे. यापूर्वी पंजाबला २०१४ मध्ये अंतिम सामना जिंकण्यात अपयश आले होते, तर बंगळुरूला २००९, २०११ आणि २०१६ साली उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पहिल्या विजेतेपदासाठी दोन्ही संघ १८ वर्षांपासून प्रतिक्षेत आहेत.

आयपीएल २०२५ स्पर्धेत आणि बंगळुरू या दोन्ही संघांनी साखळी फेरीत प्रत्येकी १४ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आणि ४ सामने पराभूत झाले. तसेच दोन्ही संघांचा १-१ सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे त्यांचे प्रत्येकी १९ गुण होते. पण नेट रन रेटच्या फरकामुळे साखळी फेरीत पंजाब अव्वल आणि बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

प्लेऑफमध्ये क्वालिफायर १ सामन्यात पंजाबला पराभूत करत थेट अंतिम सामना गाठला होता. पण पंजाबने दुसऱ्या संधीचा फायदा घेतला आणि क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम सामना गाठला आहे. आता आयपीएल २०२५ विजेतेपदाचा मान कोणता संघ मिळणार हे पाहाणे औतुक्याचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.