लोकप्रिय दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli ) यांचा 'एसएसएमबी २९' (SSMB 29) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचे कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पहिल्यांदा एकत्र झळकणार आहेत. नुकतीच या चित्रपटासंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.
'एसएसएमबी २९' या चित्रपटासाठी एसएस भव्य सेट उभारत आहेत. एसएस राजामौली यांच्या चित्रपटात राजशाही थाट, भव्यदिव्य सेट कायम पाहायला मिळतात. 'एसएसएमबी २९' चित्रपटाच्या नवीन सेटचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
'एसएसएमबी २९' चित्रपटासाठी (Hyderabad ) भव्य सेट उभारण्यात येत आहे. ''चा (Varanasi ) हा भव्य सेट असणार आहे. यात घाट, मंदिरे पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात बराचसा भाग वाराणसीमधील असल्यामुळे हा भव्य सेट उभारण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हा भव्य सेट हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये (Ramoji Film City) तयार करण्यात येत आहे. यासाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात महागडा सेट असल्याचे बोले जात आहे. यामुळे 'एसएसएमबी २९' पाहण्यासाठी आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'एसएसएमबी २९' चित्रपटाचे आतापर्यंत दोन शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहेत. महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.