Maharashtra Politics Live Updates : आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, निकृष्ट जेवणामुळे मारहाण केल्याची कबूली
Sarkarnama July 09, 2025 11:45 PM
9 लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून, परतीच्या वारीमध्येही दि. 10 जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १,११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

आमदार निवासात निकृष्ट जेवण

पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदारा निवासात मुक्कामी आहेत. मंगळवारी रात्री आपल्याला निकृष्ट आणि शिळे जेवण दिल्याचे सांगत कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या कानाखाली तसेच त्याच्या ठोसा मारला. संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला देखील धारेवर धरले.निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

धक्कादायक! कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर एक्स्प्रेस गाडीत अत्याचार

कल्याण रेल्वे स्थानकातून एका 16 वर्षीय मुलीवर धावत्या एक्सप्रेस गाडीत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या या अल्पवयीन मुलीला फूस लावून एका तरुणाने आपल्या गावी देण्याच्या बहाणाने इगतपुरी ते अकोलाच्या प्रवासादरम्यान अत्याचार केला. नंतर आरोपीने या मुलीला पुन्हा कल्याण रेल्वेस्थानक परिसरात आणून सोडले. पोलिसांनी ही पीडित मुलगी दिसल्याने तिची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.