व्हॉट्सअॅपपेक्षा किती वेगळं आहे इलॉन मस्कचं XChat? जाणून घ्या हे 5 खास फरक
Tv9 Marathi July 10, 2025 05:45 AM

इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत आणि यावेळी कारण आहे त्यांचा नवा मॅसेजिंग प्लॅटफॉर्म XChat. WhatsApp ला थेट टक्कर देणाऱ्या या नव्या अ‍ॅपबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. WhatsApp ही जगातील सर्वात मोठी इंस्टंट मेसेजिंग सेवा असली तरी XChat मस्कच्या ‘Everything App’ या विजनचा एक भाग आहे. हे अ‍ॅप अनेक अशा वैशिष्ट्यांसह येतं जे WhatsApp पेक्षा वेगळं आणि काही बाबतींत आधुनिक आहे. चला पाहूया WhatsApp आणि XChat यामधील 5 प्रमुख फरक काय आहेत.

मोबाईल नंबरची गरज नाही

WhatsApp वापरण्यासाठी वैध मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. नंबर शिवाय अकाउंट तयार होणार नाही आणि कोणालाही मेसेज करता येणार नाही. पण XChat मध्ये या गोष्टीची गरज नाही. तुम्ही थेट तुमच्या X (पूर्वीचं Twitter) अकाउंटवरून लॉगिन करू शकता. ज्यांना मोबाईल नंबर शेअर करायचा नसेल, त्यांच्यासाठी ही सुविधा खूप फायदेशीर ठरते.

स्वतंत्र अ‍ॅप नाही, X मध्येच इंटिग्रेटेड

WhatsApp एक स्वतंत्र अ‍ॅप आहे Android, iOS आणि वेबवर ते स्वतंत्रपणे चालतं. पण XChat, Twitter/X च्याच अ‍ॅपमध्ये इंटिग्रेटेड आहे. म्हणजे वेगळं अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. चॅटिंग, कॉलिंग आणि मीडिया शेअरिंग सारं काही X मध्येच करता येईल.

सिक्युरिटीमध्ये एक पाऊल पुढे

WhatsApp ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचं end-to-end encryption. पण इलॉन मस्क यांच्या म्हणण्यानुसार, XChat मध्ये Bitcoin-लेव्हल सिक्युरिटी आहे. म्हणजेच हे अ‍ॅप WhatsApp पेक्षा अधिक सुरक्षित आणि हॅक-प्रूफ असू शकतं. जर हे खरं ठरलं तर चॅटिंगच्या दुनियेत ही एक नवी क्रांती ठरू शकते.

मेसेज आपोआप डिलीट होतील

WhatsApp मध्ये ‘Delete for Everyone’ ऑप्शन मिळतो म्हणजे वापरकर्ता स्वतःहून मेसेज डिलीट करू शकतो. पण XChat मध्ये ‘Auto Delete’ फिचर आहे. यामध्ये ठराविक वेळेनंतर मेसेज आपोआप गायब होतात. त्यामुळे प्रायव्हसी अधिक मजबूत राहते.

अजून सगळ्यांसाठी उपलब्ध नाही

WhatsApp सर्वांसाठी उपलब्ध आहे, मग तुम्ही Android वापरत असाल, iPhone वापरत असाल किंवा वेब वर लॉगिन करत असाल. पण XChat सध्या बीटा स्टेजमध्ये आहे आणि केवळ X Premium युजर्ससाठीच उपलब्ध आहे. म्हणजे सर्वसामान्य वापरकर्त्यांना यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.