Mumbai mill workers : गिरणी कामगारांच्या लढ्याची 43 वर्षे; 1982चा ऐतिहासिक संप...
Sarkarnama July 10, 2025 08:45 AM
Bala Nandgaonkar मनसेकडे नेतृत्व

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगारांनी हक्काच्या घरांसाठी आज आंदोलन केले.

Uddhav Thackeray ठाकरेंचा पाठिंबा

गिरणी कामगारांना हक्काच्या घरांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला.

Mumbai mill workers पहिला संप

गिरणी कामगारांनी मुंबईत 18 जानेवारी 1982 रोजी मध्ये पहिला आणि मोठा संप केला होता.

Mumbai mill workers हक्कांच्या घराची मागणी

हा संप, वेतन आणि बोनससाठी सुरू झाला होता, कालांतराने घरांच्या हक्कांसाठी लढ्यात बदलला.

Mumbai mill workers 43 वर्षांपासून लढा

गेल्या 43 वर्षांपासून, म्हणजेच आजही, गिरणी कामगार आणि त्यांचे वारस त्यांच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत.

Mumbai mill workers गिरण्यांचे मॉलमध्ये रूपांतर

मुंबईतील गिरण्यांचे मॉलमध्ये रूपांतरित झाले आहे आणि चाळींची जागा आता गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे, पण गिरणी कामगारांचा संघर्ष सुरूच आहे.

Mumbai mill workers संघर्ष समिती

गिरणी कामगार संघर्ष समिती आणि इतर संघटना या लढ्यात सक्रिय सहभागी असून, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Mumbai mill workers एकजूट टिकून

गिरणी कामगारांनी त्यांची एकजूट आणि लढाऊ वृत्ती आजही जपली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळवण्यास मदत होईल.

NEXT : DRDO मध्ये सुवर्णसंधी! इंटर्नशिपसोबत मानधनही... येथे क्लिक करा :
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.