बदलापूर : मराठीचा मुद्दा तापला असताना अमराठी भाषिकांना राग अनावर झाल्याने मनसे महिला पदाधिकाऱ्यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. बदलापुरातील मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांना एका अमराठी व्यक्तीने समाजमाध्यमातून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
राज्यात सुरू असलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच या मुद्द्यावर मनसेने आग्रही भूमिका घेतली असून, त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आता धमक्या दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. शहरातील मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णययाप्रकरणी चेंदवणकर यांनी सुरुवातीला बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर पोलिस आयुक्तांची भेट घेत, यासंबंधी तक्रार केली आहे. दरम्यान, ‘मराठीसाठी आम्ही कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही,’अशी भूमिका चेंदवणकर यांनी घेतली आहे.
मराठी भाषेसाठी मनसैनिक आक्रमकमीरा रोड येथे मनसे कार्यकर्त्यांनी काल मराठी भाषेसाठी मोठा 'मोर्चा' काढला होता. एका दुकानदारावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाषा आणि अस्मितेशी संबंधित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
जर कोणी विष सेवन केले तर त्याला प्रथम काय द्यावे? त्या व्यक्तीला कसे वाचवावे? जाणून घ्या...