Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या मुंबईतील मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला, केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना नाही, असं राऊतांनी सांगितलं. तसेच आम्ही लढा देण्यासाठी तयार आहोत. शिवसैनिक मागे हटणारे नाहीत, असं राऊत म्हणालेत. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी हिंदी भाषेतील एका कवितेच्या ओळी म्हणत शिवसैनिकांत स्फूर्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
“शिवसैनिक कधी खचणारा नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी जी प्रेरणा आणि ऊर्जा दिली ती कच खाणारी नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही लढत राहू, आमचे नेते उद्धव ठाकरे हेसुद्धा रण मैदानात उभं राहून सर्व आव्हाने झेलत आमच्यासोबत लढत आहेत, असंर राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते जिथे जिथे जात आहेत. तिथे शेतकरी, कार्यकर्ते जमा होत आहेत. कालच्या विधानसभेच्या निकालावर त्यांचा आजही विश्वास नाही. तरीही ते लढायला तयार आहेत. तुमचं नेतृत्व त्यांना हवं आहे. संघर्षाची त्यांची तयारी आहे. पुढला विजय हवा असेल तर संघर्ष केलाच पाहिजे. संघर्षाशिवाय पर्याय नाही, असं मत राऊतांनी व्यक्त केलं.
संजय राऊत यांनी हिंदीतील कवी गोपालदास नीरज यांची कविता बोलून दाखवली.
है बहुत अंधियार अब सूरज निकलना चाहिए जिस तरह से भी हो ये मौसम बदलना चाहिए
रोज़ जो चेहरे बदलते है लिबासों की तरह अब जनाज़ा ज़ोर से उन का निकलना चाहिए
अब भी कुछ लोगो ने बेची है न अपनी आत्मा ये पतन का सिलसिला कुछ और चलना चाहिए
फूल बन कर जो जिया है वो यहां मसला गया ज़ीस्त को फ़ौलाद के सांचे में ढलना चाहिए
छीनता हो जब तुम्हारा हक़ कोई उस वक़्त तो आंख से आंसू नहीं शोला निकलना चाहिए
अशी कविता सादर करत राऊतांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लढत राहावे, असे आवाहन केले.