खासगी बसचा 1 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा, महायुती सरकारच्या अनास्थेचा निषेध
Marathi June 26, 2025 07:24 AM

मुंबईतील खासगी बसमालकांच्या विविध मागण्यांकडे महायुती सरकारने दुर्लक्ष केले आहे. वारंवार पाठपुरावा करुनही सरकारची अनास्था कायम असल्यामुळे खासगी बसमालक संप पुकारण्याच्या पवित्र्यात आहेत. सरकारच्या अनास्थेचा निषेध म्हणून 1 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत, असा इशारा खाजगी बसमालकांनी दिला आहे.

ई-चलानच्या अंमलबजावणीला खासगी बसमालकांचा तीव्र विरोध आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांमधील त्रुटी व वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम करणाऱया सरकारी कामकाजातील विविध बाबींच्या निषेधार्थ संप पुकारणार असल्याचे मुंबई बस मालक संघटनेचे मुराद नाईक यांनी बुधवारी जाहीर केले. संपामध्ये सर्व प्रकारच्या बस सामील होणार आहेत. त्यात स्कूल बस, उबरसारख्या अॅग्रीगेटर बस तसेच खासगी वाहतूकदारांचा समावेश असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.