भारतीय ऑटो मार्केटमध्ये ग्राहकांची सर्वाधिक पसंती मायलेज देणाऱ्या कार्सना मिळते. कारण इंधन दरवाढ आणि रोजच्या वापराचा विचार करता, जास्त मायलेज देणाऱ्या कार्सना मोठी मागणी असते. ही गरज ओळखून अनेक ऑटो कंपन्या आपल्या कार्समध्ये मायलेज आणि परफॉर्मन्स यांचं उत्तम संतुलन साधत आहेत. अशा कंपन्यांमध्ये होंडा ही एक आघाडीची कार निर्माता कंपनी ठरते.
होंडाच्या कार्सना त्यांची टिकाऊ गुणवत्ता, स्टायलिश लुक्स आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जातात. शहरात दररोज चालवण्यासाठी तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी होंडाच्या कार्स एक विश्वासार्ह पर्याय मानल्या जातात.
या इलेक्ट्रिक कारने Tata च्या लोकप्रिय EVs ला दाखवला बाहेरचा रस्ता, सटासट विकले गेले 19,394 युनिट्स
होंडाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत आहेत. Honda City E: Hev Hybrid since ही त्यातीलच कार कार. नुकतेच या कारच्या किमतीत घट करण्यात आली आहे आहे. या कारच्या किंमतीत 95,000 रुपयांची कपात केली आहे.
या कपातीनंतर, होंडा सिटी ई:हायब्रिडची नवीन एक्स-शोरूम किंमत 20,85,000 रुपयांवरून 19,89,990 रुपये झाली आहे. या किमतीत कपात झाल्यानंतर, ही कार त्याच्या सेगमेंटमधील एकमेव मजबूत हायब्रिड सेडान पर्याय बनली आहे. चला कारची फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जर आपण या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, होंडा सिटी ई हायब्रिडमध्ये 1.5-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 98bhp पॉवर आणि 127Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारमधील इंजिन हायब्रिड सेटअपसह जोडलेले आहे जे जास्तीत जास्त 126bhp पॉवर आणि 253Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होंडा सिटी ई हायब्रिड त्याच्या ग्राहकांना सुमारे 26 ते 27 किलोमीटर मायलेज देते.
घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या Osho कडे तब्बल 93 Rolls Royce Cars, एवढा पैसा आला कुठून?
दुसरीकडे, ग्राहकांना कारच्या केबिनमध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7 इंचाचा डिजिट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 37 कनेक्टेड फीचर्स आणि स्मार्ट वॉच इंटिग्रेशन देण्यात आले आहे. याशिवाय, कार ग्राहकांना इलेक्ट्रिक सनरूफ आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारखी फीचर्स देखील मिळतात. दुसरीकडे, ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी, कारमध्ये 6-एअरबॅग्ज, ADAS तंत्रज्ञान, डिस्क ब्रेक आणि हिल स्टार्ट असिस्ट सारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत.