Budget Session Live Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा केली जाईल आणि विचारमंथन करून देशाला बळकट करणारे कायदे केले जातील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. महिलांच्या हक्कांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, या अधिवेशनात असे अनेक निर्णय घेतले जातील, जेणेकरून महिलांना सन्मानाचे जीवन मिळेल.'
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पीएम मोदींनी देवी लक्ष्मीचे स्मरण केले. ते म्हणाले की, ही शतकानुशतके जुनी परंपरा आहे. कल्याणासोबतच माता लक्ष्मी समृद्धी आणि बुद्धी देते. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहो ही प्रार्थना.
रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म त्रिसूत्रीरिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या विषयावर बोलताना पीएम मोदी म्हणाले, 'जेव्हा विकासाचा वेग वाढवायचा असतो, तेव्हा सुधारणांवर जास्तीत जास्त भर दिला जातो. यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एकत्र काम करायचे असते. या दोन्ही प्रक्रियेनंतर लोकसहभागातून परिवर्तन घडताना दिसत आहे.
सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणारउद्या (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या अडीच ते तीन दशकांत पहिल्यांदाच अर्थमंत्री सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.