टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीतील सामना रंगणार आहे. मात्र हा सामना रोहितसेनेचा नाही, तर मास्टर्स टीममध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. सचिन तेंडुलकर याच्याकडे इंडिया मास्टर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर ऑलराउंडर शेन वॉटसन याच्याकडे ऑस्ट्रेलिया मास्टर्सचं नेतृत्व आहे.
दोन्ही संघ या हंगामात याआधी 5 मार्चला एकमेकांविरुद्ध खेळले होते. तेव्हा ऑस्ट्रेलिया मास्टर्सने इंडिया मास्टर्सवर 95 धावांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत इंडिया मास्टर्सने साखळी फेरीत सरस कामगिरी केली. इंडिया मास्टर्सने साखळी फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकले. तर ऑस्ट्रेलियाला 5 पैकी 3 सामन्यात यश आलं. इंडिया मास्टर्स साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी राहिली.
इंडिया मास्टर्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया मास्टर्स उपांत्य सामना गुरुवारी 13 मार्च रोजी खेळवण्यात येणारक आहे.
इंडिया मास्टर्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया मास्टर्स उपांत्य सामना शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे.
इंडिया मास्टर्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया मास्टर्स उपांत्य सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
इंडिया मास्टर्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया मास्टर्स उपांत्य सामना टीव्हीवर कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्स या 2 चॅनेलवर पाहायला मिळेल. तर हा सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहता येईल.
इंडिया मास्टर्स टीम: सचिन तेंडुलकर (कर्णधार), नमन ओझा (कर्णधार), सौरभ तिवारी, गुरकीरत सिंग मान, युसूफ पठाण, युवराज सिंग, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, पवन नेगी, राहुल शर्मा, धवल कुलकर्णी, अभिमन्यू मिथुन, सुरेश रैना, अंबाती रायुडू, विनय कुमार आणि शाहबाज नदीम.
ऑस्ट्रेलिया मास्टर्स टीम : शेन वॉटसन (कर्णधार), शॉन मार्श, डॅनियल ख्रिश्चन, नाथन रीअर्डन, बेन कटिंग, पीटर नेव्हिल (कर्णधार), जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, स्टीव्ह ओकीफे, बेन लाफलिन, ब्राइस मॅकगेन, झेवियर डोहर्टी, नाथन कुल्टर-नाइल, बेन डंक, कॅलम फर्ग्युसन आणि जेसन क्रेझा.