भावनांवर नियंत्रण मिळवणं हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक चढ-उतारांमुळे कधी तणाव, दु:ख, आनंद किंवा गोंधळ यांचा सामना करावा लागतो.
या भावनांना नियंत्रित करूनच आपण जीवनात स्थैर्य आणि मानसिक शांतता मिळवू शकतो.
आपलं आरोग्य नीट राहिल आणि आपलं हित जपलं जाईल अशा साधनांचा संच किंवा सेट इथन क्रॉस यांनी शोधला आहे. इथन क्रॉस हे भावनांच्या मानसशास्त्रातील जागतिक तज्ज्ञ आहेत.
इथन क्रॉस हे लहानपणापासूनच भावनांचं निरीक्षण करायचे आणि प्रत्येक वेळच्या, अनेकदा निष्क्रिय असलेल्या, कठीण भावनिक क्षण हाताळण्याच्या पद्धतींचं ते निरीक्षण करत असत.
आता मिशिगन विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ, भावना (इमोशन) आणि आत्म-नियंत्रण (सेल्फ-कंट्रोल) प्रयोगशाळेचे संचालक असलेले इथन क्रॉस यांना ही निराशाजनक स्थिती बदलेल अशी आशा आहे.
त्यांचं नवीन पुस्तक 'शिफ्ट: हाऊ टू मॅनेज युवर इमोशन्स सो दे डोन्ट मॅनेज यू' मध्ये त्यांनी आपल्याला एक असा संच (टूल) किंवा साधन दिलं आहे.
ते आपल्याला आपल्या जीवनातील चढ-उतार अधिक रचनात्मक पद्धतीनं हाताळण्यास मदत करु शकतील.
क्रॉस यांनी डेव्हिड रॉबसन यांच्याशी नकारात्मक भावना, स्वतःसाठी सुरक्षित जागा निर्माण करणं आणि असं स्थळ शोधणं जिथं आपल्या भावना जोडल्या जातील यासह भावनेशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचबरोबर अचानकपणे लक्ष विचलित होण्याच्या क्रियेबद्दलही त्यांना विचारलं.
ते सांगतात, "एक मोठा गैरसमज म्हणजे असं समजणं की काही भावना चांगल्या असतात आणि काही वाईट. सर्वांना वाटतं असतं की आपण वाईट भावनांपासून मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
माझ्या दृष्टीने हे चुकीचे विचार आहेत. आपण सर्वांनी भावना अनुभवण्याची क्षमता विकसित केली आहे, त्यामागं एक कारण आहे."
पुढं ते सांगतात, "सुधारण्याची संधी असेल तर राग आपल्याला अन्याय सुधारण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. दु:ख आपल्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि मुळापासून बदलेल्या परिस्थितींमधून नवीन अर्थ काढण्यासाठी मदत करू शकते.
ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्यासाठी प्रयत्न करण्यास इर्षा आपल्याला प्रवृत्त करू शकते, हे एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे. या सर्व उपयोगी भावना आहेत." असंही ते सांगतात.
त्यांच्या मते, या मुद्द्याला स्पष्ट करण्याचा एक मार्ग म्हणजे शारीरिक वेदनांबद्दल विचार करणं, जी आपल्या कल्पनेतील सर्वात नकारात्मक भावनिक स्थिती असू शकते.
आपल्यापैकी अनेक जण शारीरिक वेदनेशिवाय जीवन जगू इच्छितात. पण काही लोक जनुकीय विसंगतीमुळे वेदना अनुभवण्याच्या क्षमतेविना त्यांचा जन्म होतो.
अशा मुलांचं आयुष्य वेदना अनुभवू शकणाऱ्या लोकांपेक्षा आधी म्हणजे लहान वयातच संपतं.
जर त्यांचा हात आगीत अडकला, तर त्यांना हात मागे घेण्याचा इशारा देणारे कोणतेही सिग्नल नसतात. हेच तत्त्व आपल्या सर्व नकारात्मक भावनांसंबंधी लागू होतं.
नकारात्मकतेशिवाय जीवन जगण्यासाठी धडपडण्याची गरज नाही हे समजल्यानंतर लोकांना हे खूप सोपं वाटतं.
जेव्हा तुम्हाला काहीतरी साध्य करायचं असतं त्यावेळी तुम्ही फक्त या भावनिक अनुभवांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. मला वाटतं की हेच जास्त साध्य होण्यासारखं ध्येय आहे.
अनेकांना त्यांच्या भावना त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत, असा ठाम विश्वास असतो.
ही निराशावादी मानसिकता कुठून येते? आणि त्याचे परिणाम काय होतात?त्यांच्या मते, आपण भावनिक अनुभवांच्या कोणत्या पैलूवर चर्चा करत आहोत यावर ते अवलंबून आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मनात आपोआप निर्माण होणाऱ्या विचार आणि भावनांवर आपलं नियंत्रण नसतं.
पण त्या विचारांशी आणि भावनांशी कशा प्रकारे संवाद साधायचा हे आपल्याला नियंत्रित करता येतं. तिथेच भावनिक नियंत्रणाची आशा असते.
आपण काहीच करु शकणार नाही, असं जर तुम्हाला वाटू लागलं तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नही करणार नाही. उदाहरणार्थ, व्यायाम करुनही आपण तंदुरुस्त होणार नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्यायामाचा प्रयत्न कराल का?
आणि जर तुम्हाला तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करण्यासाठी रणनीती आखता येणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल का?
मग आपण कठीण भावनांच्यावेळी आपला प्रतिसाद कसा बदलू शकतो? तर त्यांच्या मतानुसार,
संगीत ऐकणं हे कमी वापरल्या गेलेल्या साधनाचं एक चांगलं उदाहरण आहे. तुम्ही संगीत का ऐकता असं जर तुम्ही लोकांना विचारलं तर जवळजवळ 100 टक्के लोक म्हणतील की, संगीत ऐकल्यावर बरं वाटतं.
परंतु, लोक त्यांच्या भावनांशी संघर्ष करत असताना काय करतात, हे तुम्ही पाहिलंय का?
उदा. काही लोकांना विचारण्यात आलं की, शेवटच्या वेळी जेव्हा ते रागावलेले, चिंतेत किंवा दुःखी होते, त्यावेळी संगीत ऐकलं का? तर त्यावेळी खूप कमी लोकांनी होकारार्थी उत्तर दिलं.
ही एक प्रकारची श्रेणी आहे ज्याला मी "शिफ्टर्स" म्हणतो. ही अशी साधनं आहेत जे आपल्या भावना बदलू शकतात.
एकदा तुम्हाला ते कसं कार्य करतात हे कळलं की तुम्ही त्यांचा तुमच्या जीवनात कसा वापर करायचा हे अधिक धोरणात्मकपणे ठरवू शकता.
पर्यावरणातील बदलामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसं सुधारू शकतं हे तुम्हाला माहिती असेल. कदाचित हा अनुभव तुम्ही तुमच्या सुटीच्या वेळी किंवा सहलीत घेतला असेल.
आपल्या दैनंदिन जीवनात हे तत्त्व आपण कसं लागू करू शकतो?डेव्हिड रॉबसन यांच्या मतानुसार, तुम्ही म्हणता तसं, अनेक लोक आपल्या कामाशी संबंधित नसलेल्या एकदम वेगळ्या ठिकाणी जाऊन आपला उत्साह वाढवतात किंवा आपली ऊर्जा पुनर्संचयित करतात.
पण आपण नेहमीच अशा सहलीला जाऊ शकत नाही. परंतु, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण राहतो त्या परिसरात अशी ठिकाणं असू शकतात. तिथं जाऊन आपण आपला मूड बदलू शकतो.
लोकांमध्ये मिसळणं किंवा त्यांच्याशी 'कनेक्ट होण्याबद्दल' आपण नेहमी बोलतो. पण जेव्हा आयुष्यात एखाद्या क्षणी गोष्टी ठीक होत नसतात. तेव्हा जवळच्या त्या व्यक्तीची केवळ उपस्थितीही आपल्याला मोकळेपणा आणि आनंद देऊन जाते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील, परिसरातील काही ठिकाणांशीही आपण या पद्धतीनं 'कनेक्ट' होऊ शकतो.
जसं माझ्यासाठी माझ्या घराजवळील आर्बोरेटम, मी माझं पहिलं पुस्तक जिथं बसून लिहिलं ते चहाचं कॅन्टिन आणि कॅम्पसमधील माझं ऑफिस ही माझ्या जवळची ठिकाणं आहेत.
या ठिकाणी मी पाऊल ठेवल्यापासून मला सकारात्मक ऊर्जा मिळते. यामुळं मला माझ्या भावनांचं व्यवस्थापन करण्यास मदत होते.
त्यांच्या मते, हे स्पाय चित्रपट किंवा पुस्तकांमधील सेफ हाऊस सारखं नसतं. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे सेफ हाऊस असतात.
जेव्हा आपण संघर्ष करत असतो, तेव्हा त्याकडे जाण्यासाठी आपल्याकडे रणनीति किंवा धोरण असायला हवं. हा बाहेरुन स्वतःचं व्यवस्थापन करण्याचा मार्ग असतो.
तुम्ही तुमच्या वातावरणाला देखील आकार देऊ (क्युरेट) शकता. आपल्याला माहीत आहे की, वनस्पती आणि हिरव्या निसर्गाची चित्रं ऊर्जा निर्माण करणारी किंवा उत्साह वाढवणारी असतात.
प्रिय व्यक्तींच्या छायाचित्रांचं देखील तसंच आहे.
ते म्हणतात, "आम्ही एक संशोधन केलं, जेव्हा लोक एखाद्या समस्येचा सामना करत असतात किंवा संघर्ष करत असतात.
तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींची छायाचित्रं दाखवली. झालं असं की, यामुळं त्या लोकांना अनुभवातून पुन्हा जोमानं उभं राहण्यास गती मिळाली, असं आम्हाला त्यावेळी आढळून आलं."
भावना बदलण्यासाठी आपण काय करू शकतो?ते सांगता, "या पुस्तकाबद्दल मला एक आशा आहे की, या माध्यमातून आपण लोकांना आपल्या आयुष्यात या साधनांचा समावेश करण्यासाठी अधिक विचारपूर्वक वागायला शिकवू.
विचलित होणं आणि टाळणं हा भावनिक क्षणांना सामोरे जाण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो, हे पाहून मला आश्चर्य वाटलं. पण असं कसं?"
"टाळणं. काहीही विचार न करण्याचा प्रयत्न करणं, जेव्हा तुम्ही स्वतःला विचलित करता किंवा इतरांमध्ये रस दाखवता – सामान्यत: हे अस्वस्थ करणारं साधन किंवा टूल मानलं जातं.
सतत टाळल्यास नकारात्मक परिणाम जोडले जातात, यात काहीच शंका नाही. हा असा दृष्टिकोन आहे, जो मी कोणालाही स्वीकारण्याची शिफारस करत नाही." असंही ते पुढं सांगतात.
त्यांच्या मते, यासाठी आपल्याला आपल्या भावना दाखवणं किंवा दाखवण्याचं टाळणं यापैकी एकाची निवड करणं गरजेचं नाही. आपण लवचिक असू शकतो आणि दोन्ही करू शकतो.
संशोधन म्हणतं की, जे लोक आपल्या भावना व्यक्त करणं आणि टाळणं या दोन्ही गोष्टी प्रभावीपणे हाताळतात. ते सहसा दीर्घकालीन चांगलं काम करतात.
आपल्या जीवनात ते कसं दिसू शकतं? समजा, तुम्हाला कुठल्या तरी कारणावरुन उत्तेजित केलं जातं.
तुम्ही कोणाशी तरी वाद घालून भावना व्यक्त करता. कदाचित त्यावर लगेचच बोलावं असाही एक दृष्टिकोन असू शकतो. पण कधी कधी विचार करुन थोडा वेळ घेतल्यास अधिक समंजसपणा दिसून येतो.
ते म्हणतात, "मी हे असं सांगतो कारण, सर्वसाधारणपणे मी अशा प्रकाराचा व्यक्ती आहे. जो गोष्टी त्वरित त्याच वेळी समोर आणून, त्यावर काम करून त्यावर विजय मिळवू इच्छितो.
पण कधी कधी मी एखाद्या दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुंतून जातो. एक दिवस त्यातच रमून गेल्यावर जेव्हा मी पुन्हा मूळ समस्येकडे जातो, तेव्हा मला त्याचा फायदा झाल्याचं दिसून येतं.
कारण जी गोष्ट मला समस्या वाटत होती. ती कधी कधी समस्या नसतेच किंवा त्या समस्येची तीव्रता तरी कमी झालेली असते. आता मी एका व्यापक दृष्टिकोनातून त्यावर विचार करू शकतो."
'आनंदा'च्या त्या मारेकऱ्याशी सामाजिक तुलना कशी करायची?त्यांच्या मतानुसार, आपण अनेकदा ऐकतो की, आपण स्वतःची इतर लोकांशी तुलना करू नये. आपण एक सामाजिक प्रजाती आहोत. आपल्या स्वतःचा आणि आपल्या स्थानाचा अर्थ लावण्याचा एक भाग म्हणजे आपली इतरांशी तुलना करणं.
हे खरं आहे की, आपण अनेकदा अशा प्रकारच्या तुलनांमध्ये गुंतले जातो. ज्यामुळं आपल्याला आपल्या स्वतःबद्दल वाईट वाटू लागतं.
परंतु, ती तुलना तुमच्या विरुद्ध काम न करता तुमच्यासाठी कार्य करेल, असा तुम्ही विचार करू शकता.
ते म्हणतात, "जर मला कळलं की कोणीतरी माझ्यापेक्षा चांगली कामगिरी करत आहे, तर मी स्वतःला म्हणू शकतो, ठीक आहे. त्यांना ते साधता आलं तर मग मी का करू शकत नाही? आता हे एखाद्या लक्ष्यासारखं झालं आहे. ज्याच्या दिशेनं मी पुढं जाऊ शकतो."
कठीण काळात वापरता येईल अशी एखादी रणनीती आहे का?"जेव्हा मी संघर्ष करत असतो, तेव्हा माझ्या संरक्षणाची पहिली ओळ म्हणजे दुरुन स्व-संवाद करणं.
मी माझं नाव आणि दुसऱ्या व्यक्तीचं सर्वनाम वापरेन. तुम्ही एखाद्या समस्येवर शांतपणे स्वतःला मार्गदर्शन करण्यासाठी, जसं की मी एखाद्या मित्राला सल्ला देत आहे. "
पुढं ते सांगतात, "नंतर मी मानसिक वेळ प्रवासात (टाइम ट्रॅव्हल) देखील गुंतवेन. मी स्वतःला विचारेन की, आतापासून एका दिवसात, 10 दिवसांत, 10 महिन्यांत मला याबद्दल कसं वाटेल? आणि मी पुन्हा मागेही येईन. "
"मी ज्या कठीण गोष्टींमधून गेलो आहे, त्यांच्याशी याची तुलना कशी होते?
बऱ्याचदा, ही साधनं मला जिथे भावनिक व्हायचं असतं तिथं पोहोचवतात. परंतु ते पुरेसे नसल्यास, मी माझ्या भावनिक सल्लागारांकडे, माझ्या नेटवर्कमधील लोकांकडे जाईन जे माझ्याशी सहानुभूती दाखवण्यात आणि मला सल्ला देण्यात खूप कुशल आहेत."
"नंतर मी हिरव्यागार निसर्गात फिरायला जाईन, किंवा एखाद्या अशा ठिकाणी भेट देईन जिथं माझ्या भावना गुंतल्या आहेत." असंही त्यांना म्हटलं आहे.
*इथन क्रॉस यांचं नवीन पुस्तक शिफ्ट: मॅनेजिंग युअर इमोशन्स सो दे डोन्ट मॅनेज यू व्हर्मिलियन (यूके) आणि क्राउन (यूएस) यांनी प्रकाशित केलं आहे.
** डेव्हिड रॉबसन हे पुरस्कार विजेते विज्ञान लेखक आणि लेखक आहेत. त्यांचे नवे पुस्तक, द लॉज ऑफ कनेक्शन: 13 सोशल स्ट्रॅटेजीज दॅट विल ट्रान्सफॉर्म युवर लाइफ, जून 2024 मध्ये कॅनॉन्गेट (यूके) आणि पेगासस बुक्सद्वारे (यूएस आणि कॅनडा) प्रकाशित केले गेले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.