बेवारस दुचाकींच्या मालकांचा शोध
भिवंडी (बातमीदार) : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने निजामपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी जप्त केलेल्या ४२ बेवारस दुचाकी मालकांकडे सुपूर्द केल्या आहेत. तसेच दुचाकींच्या तपशिलाच्या अनुषंगाने वाहनधारकांना समजपत्र दिले. काही वाहनधारकांच्या संपर्क क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. उर्वरित वाहने लवकरात लवकर त्यांच्या मूळ मालकांना परत करणार असल्याचे निर्गती पथकाचे पोलिस उपनिरीक्षक भवर, पोलिस हवालदार इंगळे, पोलिस अंमलदार कोळी यांनी सांगितले.