Ram Sutar Maharashtra Bhushan: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधान सभेत घोषणा
Saam TV March 20, 2025 11:45 PM

Maharashtra Bhushan Puraskar 2024: आज राज्य सरकारकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या मान्याच्या 'महाराष्ट्र भूषण' या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. भारताची शान असलेल्या गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले...

“महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी दिला जातो. मानपत्र, मानचिन्ह, शाल व २५ लाख रुपये असे या पुरस्काराचं स्वरूप असते. १२ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 'महाराष्ट्र भूषण २०२२४' या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री नी दिली.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे १०० वर्षांचे असून आजही ते शिल्प तयार करतात. दादर येथील चैत्यभूमी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्माराकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत”, असे पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

शिल्पकार राम सुतार यांचा परिचय

ज्येष्ठ शिल्पकार हे मुळचे जिल्ह्यातील. मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. तेव्हापासून ते आजपर्यंत रॅम सुतार शिल्पकलेत सक्रिय आहेत. त्यांनी घडवलेल्या शिल्पांचे भारतासह जगभरात कौतुक झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.