महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन तसेच त्यांचेसह आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे राज्याच्या वतीने राजभवन,
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हरित ऊर्जा, क्रीडा, शिक्षण, कृषी तंत्रज्ञान, मत्स्यपालन, यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांच्यासाठी राजभवनात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यपालांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांनी मुंबईच्या बदलेल्या रूपाविषयी आणि सुरू असलेल्या विकास कामांविषयी आज माझ्याकडून जाणून घेतले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिदेंनी सांगितले की, देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांविषयी देखील त्यांनी माझ्याकडून जाणून घेतले.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची माहिती देखील पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांनी घेतली.