Sukanya Samriddhi Scheme: गुंतवणुक कराल, फायद्यात राहाल.. ; कशी आहे सुकन्या समृद्धी योजना?
Sarkarnama March 20, 2025 06:45 AM
Sukanya Samriddhi Scheme कधी झाली सुरुवात?

22 जानेवारी 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे.

Sukanya Samriddhi Scheme एक बचत योजना

सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश म्हणजे देशातील मुलींना आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सक्षमीकरण देण्यासाठी करण्यात आलेली 'एक बचत योजना' आहे.

Sukanya Samriddhi Scheme कोणते आहेत लाभ-

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे शिक्षण, लग्नासाठी अर्थिक मदत, आणि त्याच्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक व्हावी हा उद्देश आहे.

Sukanya Samriddhi Scheme बेटी बचाओ

केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या अभियानाअंतर्गत ही योजना राबविण्यात येते. 

Sukanya Samriddhi Scheme कोण घेऊ शकतात योजनेचा लाभ?

ज्या मुलीचे वयोवर्षे 10 पेक्षा कमी असलेल्या मुलीचे पालक या योजनेसाठी अकाउंट उघडू शकतात. गेल्या 10 वर्षांमध्ये 4 कोटींहून अधिक सुकन्या समृद्धीचे खाती उघडण्यात आली आहेत.

Sukanya Samriddhi Scheme अकाउंट

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अधिकृत बॅक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे अकाउंट उघडू शकतात.

Sukanya Samriddhi Scheme कोणते दस्तऐवज-

मुलीचा जन्म दाखला, पालकांचा फोटो, पालकांचे ओळखपत्र,राहता पत्ता, सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचा अर्ज. असे महत्वाचे दस्तऐवज लागणार आहेत.

NEXT : 'आशीर्वाद' घेण्यासाठी ऋषभ पंत, झहीर खान योगींच्या दरबारी
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.