२०२५ च्या (आयपीएल) हंगामाची सुरुवात आज कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होत आहे. चाहते भव्य उद्घाटन समारंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत, यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी, गायिका श्रेया घोषाल आणि पंजाबी कलाकार करण औजला यांच्या सादरीकरणाचा समावेश असेल. उत्सवानंतर, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध खेळतील.
हा आरसीबी सामना असल्याने, सर्वांच्या नजरा वर असतील. 'विरुष्का' (विराट आणि अनुष्का शर्मा) चे चाहते देखील अनुष्काला तिच्या पतीसाठी जल्लोष करताना पाहण्याची आशा करत आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर २०१५ च्या आयपीएल उद्घाटन समारंभाच्या आठवणी व्हायरल होत आहेत. हा क्षण विराट आणि अनुष्काच्या नात्यासाठी खूप खास होता.
२०१५ मध्ये, विराट आणि अनुष्का डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या वर्षीच्या आयपीएल उद्घाटन समारंभात चाहत्यांना एक क्षण ठिपला. स्टायलिश ब्लॅक अँड व्हाईट पोशाखात अनुष्काने २०११ मध्ये आलेल्या 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल' चित्रपटातील 'ठग ले' गाण्यावर डान्स सादर केला. त्यावेळी विराट फार प्रेमाने तिचा डान्स पाहत होता. हा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली.
विराट-अनुष्काची प्रेमकहाणी
अनुष्का आणि विराटची पहिली भेट २०१३ मध्ये एका लोकप्रिय शॅम्पू ब्रँडसाठी टेलिव्हिजन जाहिरातीचे चित्रीकरण करताना झाली होती. त्यांच्यातील केमिस्ट्री तेव्हापासूनच उघड होऊ लागली. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये इटलीतील टस्कनी येथे एका खाजगी समारंभात या जोडप्याने लग्न केले. जानेवारी २०२१ मध्ये, अनुष्का आणि विराटने यांना पहिली मुलागी (वामिका) झाली. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे, अकायचे स्वागत केले.