माड्याचीवाडीत पर्यटन बहरणार
esakal March 26, 2025 11:45 PM

swt268.jpg
53587
माड्याचीवाडीः रायवाडी येथील गावडे काका महाराज यांच्या तांबाळ कृषी पर्यटन केंद्रातील पुरातन नाणी शेतीची अवजारे वास्तूला आमदार दीपक केसरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. (छायाचित्र ः अजय सावंत, कुडाळ)

माड्याचीवाडी रायवाडी येथे पर्यटन बहरणार
दीपक केसरकरः तांबाळ कृषी पर्यटन प्रकल्पाला भेट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः तांबाळसारख्या ओसाड जमिनीवर गावडे काका महाराजांनी अतिशय सुंदर विश्व साकारले आहे. तांबाळ कृषी पर्यटन प्रकल्प हा सर्वांच्या माध्यमातून चिरकाल चालू राहील, अशा प्रकारचे पर्यटन या ठिकाणी बहरेल, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी तांबाळ पर्यटन कृषी केंद्राला दिलेल्या भेटी प्रसंगी केले.
तालुक्यातील माड्याचीवाडी रायवाडी येथे सद्गुरू समर्थ गावडे काका महाराज यांच्या माध्यमातून तांबाळ कृषी पर्यटन केंद्र साकारले आहे. या पर्यटन कृषी केंद्राचे उद्घाटन मंगळवारी (ता. २५) मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. आमदार केसरकर यांनी मंगळवारी उशिरा या कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली. या परिसरात असणाऱ्या दुर्मीळ, पुरातन नाणी, शेतीची अवजारे, कोकणी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या विविध पुरातन वस्तू, २७ नक्षत्रवने, मातीची घरे, आध्यात्मिक केंद्र आदींची पाहणी त्यांनी केली. यावेळी परमपूज्य गावडे काका महाराज, सरपंच विघ्नेश गावडे, युवा उद्योजक सुजय गावडे, श्री. कुडतरकर, श्री. शिरोडकर, प्रतीक्षा सावंत, एकनाथ गावडे, सिद्धेश किनळेकर, मृणाल सावंत, प्राची कुशे, डॉ. संचित खवणेकर, सौ. बल्लाळ, दिलीप सुतार, सौ. सुतार, सौ. मोरजकर, राजेंद्र गावडे, श्री. चेंदवणकर आदी उपस्थित होते.
आमदार केसरकर म्हणाले, ‘‘अतिशय सुंदर विश्व गावडे काका महाराजांनी साकारलेले आहे. अध्यात्मातील त्यांचा अनुभव आणि निसर्गातील एकरुपतेची प्रचिती या ठिकाणी मिळत आहे. आपला कोकण हा विविध पदार्थ, फळे व प्रेमाचा संदेश देणारा प्रांत आहे. पर्यटनाने बहरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत झालेल्या तांबाळ कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून अध्यात्मिक शक्तीही पर्यटन क्षेत्राला उपयोगी ठरणारी आहे. गावडेकाका महाराज व युवा उद्योजक सुजय गावडे यांनी प्रचंड मेहनत करून हे नक्षत्रवन साकारलेले आहे. पर्यटकांना मानसिक शांती देणारा हा प्रकल्प असून, सर्वांच्या सहकार्यातून चिरकाल चालू राहील आणि येथील पर्यटन सदासर्वकाळ बहरेल, अशी माझी खात्री आहे. येथील मातीची घरे, बैलगाडी जोडी, पुरातन नाणी पाहता कोकणातील जुने वैभव होते पुन्हा या निमित्ताने आकारास येईल, अशी माझी खात्री आहे.’’
गावडेकाका महाराज म्हणाले, ‘‘कोकणचा विकास हेच माझे जीवन'' हे ब्रीद घेऊन आमदार केसरकर यांची वाटचाल सुरू आहे. भविष्यात काजू बोंडाचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना कसा मिळेल, यासाठी त्यांचे मार्गदर्शन सर्वसामान्य शेतकरी आणि बागायतदारांसाठी फार महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची उन्नती कशी साधता येईल, काजू बोंडावर प्रक्रिया करून शेतकरी आर्थिकरित्या समृद्ध कसा होईल, या दृष्टीने वाटचाल होणे महत्त्वाचे आहे. तरुण पिढीने स्वावलंबनाचे तत्व अवलंबून शेती क्षेत्राशी निगडित व्यवसायांकडे वाटचाल करावी.’’
यावेळी गावडेकाका महाराज यांच्या हस्ते आमदार केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. आमदार केसरकर यांनी एक लाखांचा धनादेश सुजय गावडे यांच्याकडे सुपूर्द केला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, भाजप जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, ज्येष्ठ मानकरी दाजी गावकर, परशुराम गावडे, चंद्रशेखर परब, बंड्या सावंत, राजू राऊळ, दीपक सांडव, उद्योजिका रुपाली सांडव, गणेश घाडीगावकर, राकेश केसरकर, एकनाथ गावडे, सिद्धेश किनळेकर, आनंद सावंत, गुरू गावडे, माजी सरपंच सचिन गावडे, सोनाली गावडे, दाजी गोलम, महसूल विभागाच्या श्रीमती देसाई, श्रीमती दळवी, युवा उद्योजक सुजय गावडे, संदीप बिर्जे, संतोष परब, नितीन पिंगुळकर आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.