पुरुषांमध्ये का वाढतं आहे mental stress? आरोग्यासंबंधित ‘या’ मानसिक आजारांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
News Update April 05, 2025 03:24 AM

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, वाढलेला तणाव, कामाचा ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. अगदी लहान मुलांपासून त्ये मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच मानसिक तणाव वाढला आहे. शरीरात मानसिक तणाव वाढल्यानंतर अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. मात्र शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. असे केल्यामुळे हेच छोटे आजार मोठे रूप घेतात. महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे.(फोटो सौजन्य – iStock)

रक्तातील साखर होईल कमी ! रोजच्या आहारात करा’ या’ रसाचे सेवन, शरीराला होतील अनेक फायदे

पुरुषांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी आणि कारणे कारणीभूत आहेत. सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांमध्ये वाढ झाल्यानंतर मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर मन अस्वथ वाटणे किंवा सतत चिंता निर्माण होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुरुषांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण का वाढले आहे? पुरुषांना कोणते मानसिक आजार होण्याची शक्यता असते? चला तर जाणून घेऊया सविस्तर.

पुरुषांमध्ये ‘का’ वाढतं आहे मानसिक आजारांचे प्रमाण:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे काहीवेळा आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हनी पोहचते. पुरुषांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सामाजिक अपेक्षा, ताण, आर्थिक समस्या, आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याची भीती. इत्यादी अनेक कारणामुळे मानसिक आजार वाढून शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरुषांमध्ये मानसिक आजारांची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नैराश्य:

पुरुषांमध्ये नैराश्य हा मानसिक आजार प्रामुख्याने दिसून येतो. शरीरात नैराश्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. या आजारांविषयी बोलताना अनेकांना भीती वाटणे किंवा मनात दडपण येऊ लागते. यामुळेच हे आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात आक्रमकता किंवा हिंसाचार वाढणे, सतत डोकं दुखणे, अस्वस्थता आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.

चिंता:

महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा चिंता वाढू लागली आहे. शरीरात वाढलेल्या चिंतेचे प्रमाण शारीरिक आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरते. स्नायूंचा ताण, पोटदुखी आणि डोकेदुखी, झोपेसंबंधित समस्या, चिंता आणि भावना व्यक्त करताना अडचणी येणे, मळमळ, घाम येणे, थरथरणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता पुरुषांनी सुद्धा आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वयाच्या ७० मध्ये हाड राहतील कायम मजबूत! उठल्यानंतर नियमित ‘या’ काळ्या दाण्यांच्या पाण्याचे सेवन , कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता

पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर:

जगभरातील सर्वच पुरुषांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. अपघात, शारीरिक हल्ला, लढाई किंवा मृत्यू इत्यादी गोष्टींशी संबंध आहे. पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर पॅनिक अटॅक, मनामध्ये सतत मृत्यूचा विचार येणे, काम करण्याची इच्छा न होणे, चिडचिड इत्यादी अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.