आडूळ : समाजकंटकांनी काही उपद्रव केल्यास किंवा गावात काही अप्रिय घटनेसह चोरी सारख्या घटनांना आळा बसावा यासाठी आडुळ ता. पैठण येथील ठिकठिकाणी असलेल्या चार मशिदीसह येथील जैन मंदिरासह परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असुन आता या धार्मिक स्थळांवर चौविस तास या तिसऱ्या डोळ्यांची नजर राहणार आहे.
शिवाय आडुळ परिसरात वाढत्या चोरीच्या घटना बघता पाचोड पोलिसांनी येथील व्यापाऱ्यांसह विविध शासकिय निमशासकिय कार्यालयात सीसीटिव्ही कॅमेरे बसवा असे आवाहन केल्यानंतर येथील अनेक शासकीय, निमशासकिय कार्यालये, विविध दुकाना, राष्ट्रीयीकृत बँका, शाळा, अरबी मदरसा, महाविद्यालय, पतसंस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे अनुचित प्रकार घडवून आणणाऱ्यांना तसेच चोरी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना मोठी मदत मिळत आहे.
दुकानातील ग्राहकावर नजर ठेवण्यास मिळते मदतमोठ्या सणांच्या काळात दुकानांत ग्राहकांची मोठी गर्दी असते. अशा गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे चोरी करित असल्याने आम्ही ग्राहकांची काळजी म्हणून चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. दुकानाच्या कामकाजाचे संपूर्ण चित्रीकरण होत असल्याने चोरट्यांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होत आहे....
अब्दुल शेख ( राजासहाब कलेक्शन, आडुळ )
समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी मशिदीत कॅमेरेमशिद व परिसरात समाजकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काही कृत्य करू नये किंवा चोरी सारखी घटना घडू नये म्हणून त्याच्या सुरक्षेसाठी हा तिसरा डोळा मशिद व परिसरात तैनात करण्यात आला आहे. सुरक्षिततेची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांनी दुकाना व धार्मिक स्थळी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेठाणे अंतर्गत असलेल्या गावात काही अनुचित प्रकार घडला किंवा समाजकंटकांनी एखादया धार्मिक स्थळी धुळघुस घातला तर तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची भूमिका मोलाची ठरते शिवाय गावात चोरी सारख्या घटनांना ही आळा बसतो.
शरदचंद्र रोडगे (सहायक पोलिस निरीक्षक, पाचोड पोलिस ठाणे )
ग्राम पंचायत ही घेणार पुढाकारगावाच्या सुरेक्षेच्या दृष्टी ने ग्राम पंचायत कार्यालया सह गावातील रस्ते व मुख्य चौकात लवकरच पंधरा वित्त आयोग निधितून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव मासिक बैठकित घेण्यात आला आहे.
नारायण पाडळे (ग्राम विकास अधिकारी, आडुळ)