आपली स्वतःची कार असावी आणि त्यातून आपण आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जावं. हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र झटत असतात. अनेकदा काही लोकांचे कुटुंब हे मोठे असते, ज्यामुळे त्यांना 7 सीटर कार्सची निवड करावी लागते. यातही अनेक ग्राहक Innova किंवा Ertiga ला पहिले प्राधान्य देत असतात. पण आता लवकरच मार्केटमध्ये नवीन 7 सीटर कार लाँच होणार आहे.
जर तुम्ही फॅमिली एमपीव्हीच्या शोधत असाल तर आता Kia Carens 2025 लवकरच अपडेटेड व्हर्जनमध्ये येणार आहे. काही डीलरशिपनी या कारचे अनधिकृत बुकिंग देखील सुरू केले आहे आणि ग्राहक फक्त 25,000 रुपयांमध्ये याची बुकिंग करू शकतात.
Ertiga किंवा Innova खरेदी करण्यात नका करू घाई ! May 2025 मध्ये ‘ही’ 7 सीटर कार करणार धमाका
किया त्यांच्या एंट्री-लेव्हल एमपीव्हीला एक स्टायलिश आणि तंत्रज्ञानाने समृद्ध फेसलिफ्ट देण्याची तयारी करत आहे. अलीकडेच, त्याच्या स्पाय फोटोज लीक झाले आहे.
या कारच्या बदलांबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या केबिनमध्ये नवीन हेडलॅम्प डिझाइन, थोडेसे सुधारित बंपर, कनेक्टिंग टेल लाईट बारसह अपडेटेड टेल लॅम्प दिसत आहेत.
किआ कॅरेन्सचे इंटिरिअर आधीपासूनच प्रॅक्टिकल आणि मॉडर्न होते, परंतु 2025 चे व्हर्जन थोडे अपग्रेड असू शकते. जसे की त्यात मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, दुसऱ्या रांगेसाठी हवेशीर जागा आणि सिंगल-पेन सनरूफऐवजी पॅनोरॅमिक सनरूफ आहे. तसेच त्यात ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स) देखील मिळू शकते, जे तुमची ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि स्मार्ट करेल.
अरे बापरे ! Kia ला समजण्याच्या आतच ‘या’ प्लांटमधून 900 इंजिनची चोरी, आता पोलिसांकडून चोरट्यांचा शोध
सध्या या कारच्या इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. हे इंजिन पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत.
2025 ची किया कॅरेन्स ही थेट मारुती सुझुकी एर्टिगा, मारुती XL6 आणि Toyota Rumion शी स्पर्धा करेल. परंतु कॅरेन्सने नेहमीच त्याच्या लूक, फीचर्स आणि सेगमेंट-ब्रेकिंग व्हॅल्यूमुळे आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे.
सध्या या कारची बुकिंग अनऑफिशियलपणे होत असली तरी परंतु पुढील काही आठवड्यात ही कार लाँच होण्याची अपेक्षा आहे, म्हणून जर तुम्ही कॅरेन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही कार 25,000 रुपयांना बुक करू शकता.