सकाळच्या नाश्त्यात अनेक घरात दाक्षिणात्य पदार्थ बनवले जातात. यात मेदू वडा, इडली-सांबार, उपमा यासारख्या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ चवीला उत्तम असल्याने आवडीने खाल्ले जातातच शिवाय पौष्टिक असल्याने शरीरासाठी फायदेशीर ठरतात. यातील पोषक घटकांमुळे वजन कमी करण्यासाठी तर दाक्षिणात्य पदार्थ वरदान समजले जातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत, जे तुम्ही आवर्जून खायला हवेत .
इडली सुट्टीच्या दिवशी हमखास घरात बनवली जाते. आंबवलेल्या पीठापासून इडली तयार करण्यात येते. इडलीचे पीठ तांदूळ आणि उडीद डाळीच्या पीठापासून बनवण्यात आली. इडली वाफवून तयार केली जात, ज्यामुळे त्या हलक्या असतात आणि त्यांचे पचन लवकर होते. त्यामुळे वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर आवर्जून इडली खावी.
इडली, मेदू वडा, वडा सांबार यासोबत सांबार बनवण्यात येतो. तूर डाळ, चिंच आणि भाज्यांच्या मिश्रणापासून तिखट, मसालेदार असा सांबार बनवण्यात येतो. यात भरपूर प्रोटिन्स असतात.
रव्यापासून बनवण्यात येणारा उपमा कमीत कमी तेलात बनवला तर वेट लॉससाठी उत्तम पर्याय आहे.
तांदळाच्या पीठाऐवजी मूग डाळीपासून तयार करण्यात येणारा डोसा कमी कॅलरीज पदार्थ आहे. यात फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहते. याशिवाय हा डोसा पचण्यास हलका असतो.
चिंच, टोमॅटो आणि विविध मसाल्यांनी बनवलेला रस्सम पदार्थ कमी कॅलरीजयुक्त आहे. यामुळे शरीराचे मेटॅबॉलिजम रेट वाढतो. त्यामुळे वेट लॉससच्या प्रयत्नात असाल तर रस्समचे सेवन अवश्य करा.
भाज्या आणि मसूर यांचे मिश्रण असलेले कुट्टू फायबर आणि प्रोटीनने समृद्ध आहेत. यात फायबर असल्याने दिर्घकाळ तुमचे पोट भरलेले राहते आणि तु्म्ही जास्त काही खात नाही.
ताक प्रोबायोटिक पेय आहे. ताकाच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहते. याशिवाय कमी कॅलरीज असणारे हे पेय आहे.
हेही पाहा –