‘या’ 5 पावडरचा त्वचेवर करा वापर, उन्हाळ्यातही फ्रेश आणि टवटवीत दिसाल
GH News April 16, 2025 12:10 PM

उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे त्वचेवर टॅनिंगची समस्या उद्भवते आणि त्यामुळे चेहरा खूप निस्तेज दिसू लागतो. त्यातच वातावरणातील उष्णता वाढत असताना चेहऱ्यावर मुरुमे येणे ही सर्वात त्रासदायक समस्या असते. कारण उष्णता वाढताच काहीजणांच्या चेहऱ्यावर लालसरपणा येणे तसेच पुरळ, मुरूम तीव्र जळजळ इत्यादी समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत त्वचेला बरे करण्यासाठी काही थंड गोष्टी चेहऱ्यावर लावाव्यात. जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल व चमकदार देखील होईल. यासाठी तुम्ही या पाच प्रकारच्या पावडरचे वापर केल्यास तुमची त्वचा फ्रेश राहील शिवाय त्वचेच्या समस्याही दूर ठेवतील. चला तर मग आजच्या या लेखात आपण उन्हाळ्यात त्वचा हेल्दी आणि चमकदार ठेवण्यासाठी कोणत्या पावडरचा वापर करावा ते जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात तुम्ही काही नैसर्गिक घटकांच्या पावडरपासून बनवलेले फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता जे केवळ टॅनिंगच नाही तर पुरळ आणि मुरुम यासारख्या समस्यांपासून देखील आराम देईल.

कडुलिंबाच्या पानांची पावडर

कडुलिंबाचे झाडाच्या मुळापासून ते देठापर्यंत, तसेच पानांपासून, फळांपर्यंत आणि सालापर्यंत सर्व प्रकारे फायदेशीर आहे. तुम्हाला उन्हाळ्यात त्वचेला आरामदायी इफेक्ट द्यायचा असेल किंवा चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करायचे असेल. तर यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर कडुलिंबाच्या पानांच्या पावडरचा फेसपॅक बनवून लावू शकता. या पावडरच्या वापराने तुम्हाला पुरळ, मुरुमांपासून मुक्त होता.

चंदन पावडर

चंदनाच्या पावडरमध्ये नैसर्गिक थंडावा असतो. यासाठी अनेकजण तणाव कमी करण्यासाठी कपाळावर चंदनाच्या पावडर लावण्यापासून ते त्वचेला बरे करण्यापर्यंत आश्चर्यकारक परिणाम दाखवते. या उन्हाळ्याच्या दिवसात चंदन पावडरचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्याचा रंग सुधारण्यास आणि त्वचा मऊ ठेवण्यास उपयुक्त ठरते.

मुलतानी माती

थंडावा देणारी मुलतानी माती उन्हाळ्यात त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. चेहऱ्यासोबतच तुम्ही ते हात आणि पायांवरही लावू शकता. यामुळे त्वचेला होणाऱ्या जळजळीपासून त्वरित आराम मिळतो. त्वचा मऊ करण्यासोबतच, मुलतानी माती पिंपल्स कमी करण्यासाठी आणि टॅनिंग काढून टाकून रंग सुधारण्यासाठी देखील काम करते.

संत्र्याच्या सालीची पावडर

उन्हाळ्यात त्वचेसाठी संत्र्याच्या सालीची पावडर तयार करून ठेवा. संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये असे काही घटक आहे जे तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यास मदत करू शकते. कडक उन्हात संत्र्याच्या सालीची पावडरचा फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावल्यास तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तसेच, त्यात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचा पोत सुधारते.

गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर

गुलाबाच्या पाकळ्या वापर केल्यास तुमच्या आरोग्यावर आणि त्वचेवरही आश्चर्यकारक परिणाम होत असतो. त्यापासून बनवलेले गुलकंद आणि रुहफजा शरीराला थंड ठेवतात तर गुलाबाच्या पाकळ्यांची पावडरचा फेसपॅक त्वचेवर लावल्यास चेहरा उजळतो. उन्हाळ्यातील त्वचेच्या काळजीसाठी गुलाबाच्या पाकळ्या धुवून वाळवा आणि त्यांची पावडर बनवा.

अशा प्रकारे सर्व गोष्टींचा फेस पॅक बनवा

तुम्ही संत्र्याच्या सालीची पावडर, गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर, कडुलिंबाच्या पानांची पावडर आणि चंदनाची पावडर समान प्रमाणात मिसळा. मुलतानी माती बारीक करून पावडर बनवा आणि वरील मिश्रणात थोडी जास्त प्रमाणात मिसळा. आता तयार झालेली ही तयार पावडर हवाबंद काचेच्या डब्यात ठेवा. आठवड्यातून एक ते तीन वेळा गरजेनुसार ही पावडर काढा आणि त्यात कोरफडीचे जेल, गुलाबजल मिसळून फेस पॅक बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 20 ते 25मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.