कोकणी पारंपरिक पद्धतीने झटपट बनवा काजूच्या बोंडूचे भरीत, अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांने सांगितली सोपी रेसिपी
News Update April 17, 2025 03:37 PM

जगभरात कोकणी पद्धतीने बनवले जाणारे सर्वच पदार्थ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. कोकणात काजूची भाजी, फणसाची भाजी, वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले मासे इत्यादी अनेक पदार्थ खूप जास्त प्रसिद्ध आहेत. कोकणी पद्धतीचा आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ अतिशय चवीने आणि आवडीने खाल्ले जातात. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच काहींना काही शेअर करत असते. वेगवेगळ्या रेसिपी, स्किन केअरविषयी नेहमीच काहींना काही माहिती, रेसिपी शेअर करत असते. नुकतीच तिने काजूच्या बोंडूचा वापर करून भरीत बनवण्याची झटपट तयार होणारी रेसिपी शेअर केली आहे. कोकणात काजूची बोंडू चुलीत भाजून नंतर त्यावर मीठ टाकून आवडीने खाल्ली जातात. चला तर जाणून घेऊया काजूच्या बोंडूचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक! बियांचा करा ‘अशा’ पद्धतीने वापर

साहित्य:

  • काजूची बोंडू
  • दही
  • जिरं
  • हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • तूप
  • कोथिंबीर

कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यासाठी खाल्ले जाते खिमट! उन्हाळ्यात नाश्त्यासाठी बनवा हेल्दी पदार्थ

कृती:

  • काजूच्या बोंडूचे भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम, काजूची बोंडू स्वच्छ धुवून त्यांच्या वरील भाग कापून घ्या. काजूच्या वरच्या भागात जास्त चीक असतो.
  • स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली काजूची बोंडू कुकरच्या भांड्यात शिजण्यासाठी ठेवा.
  • कुकरच्या ३ किंवा ४ शिट्ट्या काढून झाल्यानंतर गॅस बंद करून काजूची बोंडू बाहेर काढून थंड करा. त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करून घ्या.
  • मॅश करून घेतलेल्या बोंडूच्या मिश्रणात दही आणि खलबत्यामध्ये बारीक कुटून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरीत बनवताना त्यात शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकता.
  • फोडणीच्या भांड्यात तूप गरम करून त्यात जिरं आणि हिंग आणि चिरलेली मिरची घालून फोडणी भाजून घ्या.
  • तयार करून घेतलेली फोडणी भरीतमध्ये टाकून वरून त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले काजूच्या बोंडूचे भरीत.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.