बुलधाना अपघात बातम्या: बुलढाणा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या मलकापूर-नांदुरा दरम्यानच्या काटी फाट्याजवळ आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) भाविकांची बस उभ्या ट्रकला धडकली (Accident News) असल्याची माहिती समोर आली आहे. बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्या जवळ रात्री 3 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास 35 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व वडनेर भोलजी जवळच्या फिरोज ढाबा येथील मुस्लिम बांधव त्यांच्या मदतीला धावून आले व सर्वांनी मिळून तात्काळ जखमींना उपचारासाठी मलकपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर 10 गंभीर जखमीना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठविण्यात आल असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. हे भाविक आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक,शिर्डीला देवदर्शानासाठी जात होते. अशातच 3 दिवसा अगोदर याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्यप्रदेश परिवहनची बस व विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन 3 जण ठार तर 18 जण जखमी झाले होते.
परभणीच्या दैठणा-माळसोन्ना रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या टिप्परने धडक (Accident News) दिल्याने झालेल्या अपघातात पोरवड गावचे उपसरपंच प्रल्हाद गिराम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गिराम यांच्यासोबत असलेला त्यांचा लहान मुलगा आणि त्यांची बहीण हे दोघे जण जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी परभणीत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना कळताच पोलीस घटनास्थळी पोचले असून पुढील कारवाई केली जात आहे. गिराम यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन उपसरपंच गिराम यांचा मृतदेह पहिला असता हंबरडा फोडला असून या टिप्परचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान संतापलेल्या जमावाने टिप्परवर दगडफेक केली मात्र पोलिसांनी जमावला शांत केले. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..