बंद घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून करायचा मोबाईल चोरी
वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांनी घटना स्थळ परिसरातील सीसीटीव्ही पाहून पटवली चोराची ओळख
सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने चोराचा ठावठिकाणा शोधून मोबाईल चोराला केली अटक
मासूम परवेज अन्सारी (26 वर्ष,) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो वर्सोवा येथील राहणारा आहे
आरोपी सध्या वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात असून त्याने यापूर्वी कुठे अशा प्रकारच्या चोरी किंवा गुन्हे केले आहेत का याचा कसून शोध घेत आहे
Maharashtra News Live Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर बोलण्यास शरद पवारांचा स्पष्ट नकार हिंदी भाषेचा शासन निर्णय रद्द करावा, भाषा सल्लागार समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून केली मागणी
भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिले पत्र
इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आल्याचा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी
SCERT कडून याबाबतचा निर्णय घेताना भाषा सल्लागार समितीला विचारात घेतली नाही
असा आरोप करण्यात आलाय
राज्य सरकारला भाषा संदर्भात सल्ला देण्यासाठी शासनानेच भाषा सल्लागार समिती नेमली आहे
अस असताना राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने शासन नियुक्त समितीला कुठे ही विचारात घेतले नाही
शासनाने हो हिंदी भाषा लादण्याचा निर्णय घेतलाय त्याला भाषा सल्लागार समितीने विरोध केलाय
उन्हाचा तीव्रतेमुळे ट्रांसफार्मरला चक्क कॉलरचा आधारनंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे आणि याच वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांच्या जनजीवनावर होतानाचा पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे याच उन्हाचा तीव्रतेमुळे वीज वितरण कंपनीला देखील याचा फटका बसतो आहे विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर हा हिट होत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने आता ट्रांसफार्मरला चक्क कुलर लावून थंड केले जात आहे.. ट्रांसफार्मर हीट होऊन ट्रीप होऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी या सर्व उपाययोजना महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षा वाटपमहिला व बालविकास विभागामार्फत मार्फत महाराष्ट्रातील गरजू महिलाना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येणार..
या योजने अंतर्गत शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाणार..
राज्यात एकूण 8 जिल्ह्यात दहा हजार पिंक ई रिक्षा वाटप केले जाणार
पुणे नाशिक नागपूर संभाजी नगर सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर अमरावती या आठ जिल्ह्यात वाटप केले जाणार
त्याच पार्श्वभूमीवर आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 50 पिंक ई रिक्षा वाटप केले जाणार..
-नागपुरातील नियोजन भवन येथे कार्यक्रम पार पडणार...
17 वर्षाच्या शेतकऱ्याने फुलवली डाळिंब शेतीसांगलीच्या आटपाडी येथील एका 17 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं डाळिंबाची यशस्वी शेती केली आहे.शुभम मरगळे,असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून 15 एकर मधून तब्बल 70 टन डाळींबाचे शुभमने भरघोस उत्पादन घेतले आहे. वार्षिक 1 कोटीहून उत्पन्न मिळत आहे. वार्षिक निव्वळ नफा 7 लाख रुपये मिळत आहे. वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली शुभमनं वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी डाळिंब शेतीत पाऊल ठेवत डाळिंब बाग फुलवली आहे..
Maharashtra News Live Updates :- उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द, समीर भुजबळ यांची माहिती- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द
- हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अजित पवारांचा दौरा रद्द
- माजी खासदार समीर भुजबळ यांची माहिती
Maharashtra News Live Updates :- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागताला माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित- समीर भुजबळ होते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष
- विधानसभेला समीर भुजबळांनी दिला होता मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा
- राजीनामा दिल्यानंतर समीर भुजबळांनी केली होती नांदगांव मतदार संघात बंडखोरी
- अद्यापही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपद आहे रिक्त
- पिंप्री सदो येथील हेलिपॅडवर अजित पवारांच्या स्वागतासाठी समीर भुजबळ आहेत उपस्थित
कात्रज अडकले वाहतूक कोंडीतकात्रज चौक,कात्रज देहू रस्ता बायपास, कात्रज कोंढवा रस्ता, कात्रज मांगडेवाडी रस्ता या भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
कात्रज चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू असून एकेरी वाहतूक केल्याने तर दुसरीकडे दत्तनगर मार्गे जांभूळवाडी आंबेगावकडे जाणाऱ्या राजमाता भुयारी मार्ग कामासाठी बंद ठेवण्यात आल्याने संपूर्ण वाहतूक या मार्गावर वळवण्यात आलीय त्यामुळे कात्रज परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यानी केला पोलिस ठाण्यात तक्रार अर्जमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदें आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल काण्यात आलाय.. कर्जमाफीचे आश्वासन देऊनही पूर्तता न केल्याने एका शेतकऱ्याने वकिलांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केलाय...
बुलढाणा जिल्हा बनत चाललाय " अपघातांचा जिल्हा ".बुलढाणा जिल्ह्यातून तीन मोठे राष्ट्रीय महामार्ग तर समृद्धी हा द्रुतगती महामार्ग जातो . मात्र या महामार्गांवर दिवसेंदिवस वाढती वाहतूक व बेशीस्त वाहन चालकांमुळे अपघातांच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मात्र सामान्यांचे जीव जात असल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरात बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दोन, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर दोन मोठे अपघात तर अजिंठा - बैतूल राष्ट्रीय महामार्गावर दोन असे सहा मोठे अपघात झाले. सहा दुचाकीचे ही अपघात झाले असून यात जवळपास २२ जणांचे जीव गेलेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस बेशीस्त वाहतूक वाढत असून यावर मात्र प्रशासन कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही....
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या सोलापूर दौऱ्यात दोन गटात झाला राडा,पाच जणांवर गुन्हा दाखलरोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या समोरच शिवसेनेतील दोन गट एकमेकांना भिडले.यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज शेजवाल या दोन गटात हा राडा झाला.शेवटी या दोन गटात मध्यस्थी करत मंत्री भरत गोगावले यांना हा राडा थांबवावा लागला.या संपूर्ण राड्याचे सीसीटीव्ही फुटेज आता सामोरं आलं आहे.दरम्यान,या बाबतीत आता जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या तक्रारीवरून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये मनोज शेजवाल,सागर सोलापुरे,उमाकांत कारंडे,समर्थ बिराजदार आणि राजू शिंदे यांचा समावेश आहे.
नागपूर-रत्नागिरी महामार्गवरील रस्त्याच्या कडेला 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेहसांगलीच्या मिरजेतील अंकली रोडवर एका 70 वर्ष वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील अंकलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मृतदेह आढळला आहे.या घटनेनंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.दरम्यान या घटनेची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम मिरज पोलीस करत आहेत.
शरद पवार करणार दोन दिवसाचा कोकण दौराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार 24 आणि 25 असा दोन दिवसाचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा करणार आहेत. ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विक्टर डान्टस यांनी दिली आहे. कोकणातील पक्ष संघटना वाढविण्याबरोबरच काही महत्त्वाच्या ठिकाणांना शरद पवार भेट देणार आहेत. 24 एप्रिलला शरद पवार दुपारी अकरा वाजता वेंगुर्ला येथील नाथ पै सेंटरला भेट देणार आहेत. त्यानंतर ते आरवली येथे भेट देणार आहेत. 25 ला ते आरवली होऊन आंबोलीला भेट देणार आहेत. दोन दिवसीय या दौऱ्यात ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वास्तव्य करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर - पैठणच्या ढाकेफळ येथे विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यूछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या ढाकेफळ येथे बांधकाम सुरु असलेल्या नवीन घरावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय मुलाचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.साबेर शाकेर शेख असे मयताचे नाव आहे. ढाकेफळ येथील साबेर शेख हा गावातील तुकाराम हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी असून, त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्याच्या नवीन घराचे गावात बांधकाम सुरू होते आणि शनिवारी सकाळी साबेर हा त्या बांधकामावर पाणी मारत होता. यादरम्यान पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा विजेचा धक्का बसून तो जागेवरच कोसळला. कुटुंबियांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांने त्यास तपासून मृत घोषित केले.
धातूचा तुकडा घरावर पडल्याने एकच खळबळ उडाली- नागपुर जिल्ह्याचा उमरेड तालुक्यात शनिवारी 4 वाजता पहाटे एक धातूचा तुकडा घरावर पडल्याने एकच खळबळ उडालीय...
- एका मोठया स्फोटचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या इमारतीवर पडला असल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं..
- आवाज येताच सर्व लोक घाबरून घराबाहेर पडले.
अवांतर कामातून शिक्षकांची सुटकाशैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण
राज्यातील शाळा स्तरावरील 15 विविध समित्यांचे विलीनीकरण करण्यात आले असून,समित्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे.
यामुळे आता मुख्याध्यापक शिक्षकांना अध्ययन-अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ देता येणार आहे.
अशैक्षणिक कामातून सुटका करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून राज्यातील शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती.
त्यानुसार शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
वडगावला कालवा परिसरात करवंट्यांच्या ढिगांचा भुसा करताना हवेत प्रदूषणसिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर पुलाजवळील खडकवासला कालव्यालगत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या जागेवर महापालिकेच्या ठेकेदाराने कचऱ्याचे डंपिंग केलेल्या नारळ, शहाळे व करवंट्यांचे ढीग मशिनद्वारे बारीक भुसा करताना त्याची धुळ संपूर्ण हवेत मिसळून नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार समोर आला आहे.सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी लोकवस्तीच्या मध्यवर्ती भागात ठेकेदाराने संपूर्ण पुणे शहरातील नारळ, शहाळे व करवंटे एकत्रित गोळा करून सिंहगड रस्त्यावरील वडगाव परिसरात कालव्याच्या शेजारी डंपिंग करून मोठमोठे ढीग तयार केले आहेत. गोळा केलेला कचरा मशिनद्वारे याठिकाणी भुश्यासारखा बारीक करण्याची प्रक्रिया दिवसभर सुरू असते. बारीक भुसा करताना भुसा हवेत मिसळत आहे. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. ज्याठिकाणी कचरा बारीक करण्यात येतो त्याठिकाणी मुंबई बंगळूर महामार्ग, सिंहगड रस्ता व मधूकोष सोसायटीच्या बाजूने शरद हॉस्पिटल कडे जाणारा रस्ता असल्याने त्याठिकाणी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. वाहनचालक प्रवास करताना मशिनद्वारे हवेत उडणारा भुसा त्यांच्या नाक, डोळे व तोंडात जात असल्याने अपघाताचा धोका व अनेक आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार..आमदार सुनील शेळकेंचा पर्यावरण रक्षणासाठी संकल्पमी एक लाख दहा हजार मतांनी निवडून आलो... आता त्याच प्रमाणात म्हणजे एक लाख दहा हजार झाडे लावणार.. असा ठाम आणि प्रेरणादायी संकल्प मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी उपस्थित नागरिकांना 'झाडे लावा आणि झाडे जगवा', हा संदेश दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरू अभंग गाथावन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके बोलत होते..
आपण डोंगर फोडतो, काँक्रिटचे रस्ते, पूल उभे करतो. आजूबाजूला फक्त सिमेंटचं जंगल दिसतं. पण झाडं लावणं आणि त्यांचं संगोपन करणं ही आता काळाची गरज आहे...
माळपठारावरील परिसरात तीव्र पाणीटंचाईयवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळपठारावरील भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळा लागण्यापूर्वीपासूनच माळपठारावरील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना भेडसावते टँकर व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाचा दरवर्षी प्रयत्न राहतो तरी देखील नागरिकांची पाणीटंचाईतून काही केल्या सुटका होत नाही,कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
किनवटच्या सुभाषनगरमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खूनजुन्या वादाचा राग मनात ठेवून एका तरुणावर काठी आणि दगडाने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना नांदेडच्या किनवट शहरातील सुभाषनगर येथे
घडली आहे.या.समीर इब्राहिमशाह शेख असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.सलमान खान रशीद खान पठाण याने जुन्या भांडणाचा राग धरून समीर शेख या तरुणाचा खून केला आहे. सुभाषनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर आरोपीने समीर याच्या डोक्यात काठी आणि दगडाने प्रहार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात समीरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर किनवट पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.
उष्णतेच्या लाटेत काकडीला मागणी वाढली.नांदेडमध्ये सध्या तापमान 42 अंशावर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे, त्यात जीवाला थंडावा देणाऱ्या थंडगार काकडीची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आलेयत. नांदेडमध्ये सध्या काकडी 80 ते शंभर रुपये किलो इतक्या दराने विक्री होत असल्याने काकडी उत्पादक शेतकऱ्याला चांगला आर्थिक फायदा होत आहे. नांदेडच्या सुजलेगांव इथल्या हणूमंत तांदळे या शेतकऱ्यांने वीस गुंठे क्षेत्रात काकडीची लागवड केली होती.त्यातून आता दररोज 90 किलो काकडी विक्रीसाठी निघत आहे. त्यातून या शेतकऱ्याला चांगले आर्थिक उत्पन्न होत असल्याने समाधान व्यक्त केलय.
पंढरपुरात शिवसेनेचा शेतकरी मेळावाशिवसेना प्रणित शेतकरी सेनेचा राज्यातील पहिला शेतकरी मेळावा पंढरपुरात पार पडला. शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. शेतकरी मेळाव्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव,शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव हे प्रमुख उपस्थिती होते.
शेतकरी कर्ज माफी करावी अशी प्रमुख मागणी या मेळाव्यात करण्यात आली. शेतकरी सेनेच्या पदाधिकार्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या समस्या जाणून घ्या असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले. शेतकरी मेळाव्यासाठी राज्यभरातून शेतकरी व शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra News Live Updates : नाशिकमध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ येणार एकाच व्यासपीठावर- सरकार स्थापनेनंतर नाशिकमध्ये पहिल्यांदाच दोन्ही नेते येणार एकाच व्यासपीठावर
- मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ मागील काही महिन्यांपासून नाराज
- त्यामुळे अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यात याआधी भुजबळ कुठल्या ना कुठल्या कारणाने होते अनुपस्थित
- नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयात होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर
- या आधी नाशिकमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनाला देखील दोन्ही नेते असणार एकत्र
- छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सन्मानाने स्थान मिळावं, यासाठी राष्ट्रवादी कार्यालयासमोर लावण्यात आलंय बॅनर
- आजच्या राष्ट्रवादी कार्यालयात होणाऱ्या मेळाव्यात अजितदादा काय बोलणार याकडे लक्ष
Maharashtra News Live Updates : शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख अंकुश कडू याची हत्यानागपूरमध्ये शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख अंकुश कडू याची हत्या करण्यात आली आहे. अंकुश कडू यांची भर रस्त्यात दुचाकीवरुन गाडी थांबवून हत्या करण्यात आली आहे. येथील नारी रोड माडा चौक येथील शनिवारी सायंकाळी घटना घडली.