IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित कट टू कट, महेंद्रसिंह धोनी म्हणाला….
GH News April 21, 2025 02:06 AM

आयपीएल २०२५ स्पर्धेत प्रत्येक सामन्यांच्या निकालानंतर गुणतालिकेचं चित्र बदलताना दिसत आहे. खरं तर चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद वगळता इतर सात संघात प्लेऑफची खऱ्या अर्थाने चुरस सुरु झाली आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेतील ३८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमवून १७६ धावा केल्या. तसेच विजयासाठी १७७ धावा दिल्या. मुंबई इंडियन्सने हे आव्हान १५.४ षटकात पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्सचं या पराभवानंतर गणित बिघडलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी फक्त २ सामन्यात विजय आणि ६ सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे ४ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित आता कट टू कट आलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर उर्वरित सर्वच्या सर्व सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं उर्वरित सहा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. कारण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी १६ गुणांची आवश्यकता आहे. चेन्नई सुपर किंग्सने उर्वरित ६ सामन्यात विजय मिळवला तर १६ होतील. नाही तर उर्वरित संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यामुळे यापुढे चेन्नई सुपर एखाद दुसरा सामना गमावला तर स्पर्धेतून आऊट होणारा पहिला संघ ठरू शकतो. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनी नाराजी व्यक्त केली आहे.

महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, ‘मला वाटतं आम्ही खूपच सुमार कामगिरी केली, कारण आम्हाला सर्वांना माहित होतं की दुसऱ्या हाफमध्ये दव पडेल. आम्ही मधल्या षटकांचा फायदा घेण्याच्या स्थितीत होतो. मला वाटतं की बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम डेथ बॉलरपैकी एक आहे. मला वाटतं की त्यांनी डेथ बॉलिंग लवकर सुरू केली होती, तेव्हा आम्हाला भांडवल करायला हवं होतं आणि आमचा स्लॉग थोडा लवकर सुरू करायला हवा होता. मला वाटतं की काही षटकांमध्ये आम्हाला थोडे जास्त धावा मिळू शकल्या असत्या. आम्हाला त्या धावांची गरज होती कारण दव पडताना १७५ धावा हा योग्य स्कोअर नाही.’

‘आमच्यासमोर असलेले सर्व सामने जिंकायचे आहेत, आम्ही एका वेळी एक सामना खेळतो आणि जर आम्ही काही हरलो तर आमच्यासाठी पुढील वर्षासाठी योग्य संघ निवडणे महत्त्वाचे असेल. तुम्हाला खूप जास्त खेळाडू बदलायचे नाहीत, महत्त्वाचे म्हणजे पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जर तसे झाले नाही तर पुढच्या वर्षासाठी सुरक्षित 11 मिळवणे आणि मजबूत स्थितीत परतू.’, असंही महेंद्रसिंह धोनी म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.