Actor Threat Call: 'सलमान खानच्या घरी गोळीबार केला तसाच...'; 'या' टीव्ही अभिनेत्याला बिश्नोई टोळीकडून धमकी
Saam TV April 21, 2025 02:45 AM

Actor Gets Death Threat Call: टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका कार्यक्रमात आसिम रियाजबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. या वादात आता आणखी गंभीर वळण आलं आहे. आता अभिनवला लॉरेंस बिष्णोई गँगकडून जीव मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

एका अज्ञात व्यक्तीने अभिनवला ई-मेलद्वारे धमकी दिली असून त्यामध्ये त्याचं नाव थेट बिष्णोई गँगशी जोडलं गेलं आहे. विशेष म्हणजे सलमान खानला देखील यापूर्वी याच गँगकडून धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

यामुळे अभिनव शुक्ला आणि त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. अभिनवने माध्यमांना सांगितलं की, "हे फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही धोकादायक आहे."

या घटनेमुळे टीव्ही इंडस्ट्रीत चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. कलाकारांवर सतत वाढणाऱ्या सोशल मीडिया वादांचे गंभीर परिणाम आता प्रत्यक्ष जीवनावर होताना दिसत आहेत. चाहते आणि सह अभिनेत्यांनी अभिनवच्या सुरक्षिततेसाठी चिंता व्यक्त केली असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.