आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वातही कमबॅक करण्यात अपयशी ठरत आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सला पराभूत करत या मोसमात विजयी सलामी दिली होती. मात्र त्याच मुंबईने 20 एप्रिलला चेन्नईचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत पराभवाचा वचपा काढला. मुंबईने चेन्नईला वाईट पद्धतीने हरवलं. चेन्नईचा हा या मोसमातील एकूण सहावा पराभव ठरला. चेन्नईचा हा पराभव कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीला चांगलाच जिव्हारी लागला. धोनीने सामन्यानंतर बोलताना थेट 19 व्या मोसमाबाबत भाष्य केलं. धोनीने नक्की काय म्हटलं जाणून घेऊयात.
चेन्नई सुपर किंग्स टीमचा हा आयपीएल 2025 मधील आठवा सामना होता. चेन्नईने त्यापैकी सहावा सामना गमावला. धोनी हा पराभव पचवू शकला नाही. धोनीने टीम म्हणून कुठे कमी पडतोय? याकडे लक्ष द्यायला हवं, असं म्हटलं.
“सर्वात आधी हे समजायलं हवं की आम्ही यशस्वी यासाठी आहोत कारण आम्ही चांगलं क्रिकेट खेळतो. मात्र आम्हाला फार भावनिक होण्याची गरज नाही. आम्ही निट खेळतोय की नाही हे पाहावं लागेल. धावा करण्याचा प्रयत्न करतोय की नाही, हे पाहावं लागेल. काही झेल आमची मदत करतील आणि आम्ही चुका सुधारण्याचा प्रयत्न करु. एका वेळेस एकाच सामन्यावर लक्ष केंद्रीत करु. आम्ही जर प्लेऑफसाठी पात्र ठरलो नाहीत तर पुढील हंगामासाठी आतापासूनच तयारीला लागू”, असं धोनीने स्पष्ट सांगितलं.
दरम्यान चेन्नईला पहिले बॅटिंग करताना 5 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या. चेन्नईसाठी रवींद्र जडेजा याने 53 तर शिवम दुबेने 50 धावांची अर्धशतकी खेळी. प्रत्युत्तरात मुंबईकडून रोगित शर्मा याने 45 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 76 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 30 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 68 धावांची नाबाद खेळी साकारली. मुंबईने अशाप्रकारे 15.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून विजय मिळवला.
धोनीची पराभवानंतरची प्रतिक्रिया
चेन्नईचं या पराभवासह प्लेऑफचं समीकरण फार किचकट आणि जर तरचं झालं आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित 6 पैकी 6 सामने जिंकावे लागतील.