उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील तीन दिवसांपासून आपल्या साताऱ्यातील दरे गावी आहेत.
एकनाथ शिंदे हे गावी असतात तेव्हा ते शेतातील कामे करण्यात रमतात. शेतात काम करत असताना त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अंगात टीशर्ट हातात फावडे आणि झारी घेतलेला उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोटो आता समोर आला आहे.
हाता फवाडे घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात आवोकाडो फळाची लागवड केली.
आवोकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची मला पूर्ण खात्री आहे, असा विश्वास देखील शिंदेंनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंनी ट्विट करत गावी लावलेल्या आवोकाडो विषयी माहिती देताना आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेले हे फळ आहे असे म्हटले आहे.
शिंदे दरवर्षी गावी गेल्यानंतर नव्या झाडांची लागवड करतात. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड केली आहे.
एकनाथ शिंदें यांनी गावी सातारा जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.