इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ४० व्या सामन्यात मंगळवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ८ विकेट्सने विजय मिळवत १२ गुणही मिळवले आहेत. दिल्लीचा हा ८ सामन्यांमधील सहावा विजय आहे. मात्र लखनौचा ९ सामन्यांधील हा चौथा पराभव आहे. त्यामुळे ते १० गुणांवरच कायम राहिले आहेत.
या सामन्यात दिल्लीसमोर लखनौने विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दिल्लीने १७.५ षटकातच २ विकेट्स गमावत १६१ धावा करून पूर्ण केला. केएल राहुलने लखनौसाठी विजयी षटकार मारला. या विजयात मुकेश कुमार, केएल राहुल, अभिषेक पोरेल आणि कर्णधार अक्षर पटेल यांचा मोठा वाटा राहिला.
(बातमी अपडेट होत आहे)