Goa Live News: अखिल भारतीय अधिवक्ता परिषद गोवा प्रांततर्फे पेहलगाम हल्ल्याचा निषेध
dainikgomantak April 24, 2025 12:45 AM
Goa News: अखिल भारतीय अधिवक्ता परिषद गोवा प्रांततर्फे पेहलगाम हल्ल्याचा निषेध

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद गोवा प्रांततर्फे पेहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना ज्येष्ठ वकील व परिषदचे अध्यक्ष संतोष रिवणकर व इतर पदाधिकारी.

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराने केले दोन दहशतवाद्यांना ठार

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आणि बुधवारी भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले.

Pehelgam Attack News: लग्नाच्या अवघ्या 8 दिवसांनी पहलगाम हल्ल्यात 26 वर्षीय नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ वर्षीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा दुर्दैवी मृत्यू. लग्नाच्या अवघ्या आठ दिवसांनी ते त्यांच्या पत्नीसह काश्मीरमध्ये होते.

Goa Accident: मोले राष्ट्रीय महामार्गवरील दुधसागर देवस्थान ठिकाणी असलेल्या वळणावर ट्र्क व वॅगनर यांच्यात अपघात

मोले राष्ट्रीय महामार्गवरील दुधसागर देवस्थान ठिकाणी असलेल्या वळणावर ट्र्क व वॅगनर यांच्यात अपघात. चौघे जखमी.पिळये हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी पोलिस जीपमधुन पाठवण्यात आले.

Pehelgam Attack: जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले ५० हून अधिक गोवेकर श्रीनगरमध्ये अडकले, सर्वजण सुरक्षित

पेहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले ५० हून अधिक गोवेकर श्रीनगरमध्ये अडकले आहेत. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा गोव्यातील दोन गट पेहलगाममध्ये होते, सर्वजण सुरक्षित.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.