विराट कोहली आणि देवदत्त पडीकक्ल या जोडीने केलेल्या अर्धशतकी आणि वादळी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनने घरच्या मैदानात पाहुण्या राजस्थान रॉयल्ससमोर 206 धावांचं अवघड आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. आरसीबीसाठी विराटने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर देवदत्तने अर्धशतकी खेळी केली. तर इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली. आरसीबीने या मोसमात आतापर्यंत एकूण पाच सामने जिंकले आहेत. मात्र आरसीबीला घरच्या मैदानात एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आरसीबी राजस्थानवर मात करत घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.