दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्यास विमा पॉलिसी काढलेली असल्यास क्लेम करता येतो का? जाणून घ्या
Marathi April 25, 2025 12:34 AM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26  जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. यापूर्वी 2019 मध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला होता.  तर, 2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यांमध्ये ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होतो त्यांना संपूर्ण आयुष्यभरासाठी हा धक्का असतो. दहशतवादी हल्ल्यात ज्या व्यक्तींचा मृत्यू होतो त्यांच्या संदर्भात जीवन विम्याचे काय नियम असतात? त्यांना विमा संरक्षण असते त्याचा लाभ मिळतो का ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये विम्यासंदर्भातील नियम बदलले आहेत. बहुतांश जीवन विमा पॉलिसींमध्ये दहशतवादी हल्ल्यामुळं झालेल्या नुकसानाचा समावेश केलेला असतो. म्हणजेच विम्याचा क्लेम मिळतो. मात्र, यासाठी काही अटी असतात. विमा नियामक संस्था आयआरडीएच्या नियमानुसार विमा कंपन्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या मृत्यूचा देखील समावेश करतात.जर, एखाद्या व्यक्तीचा दहशतवाद्यांची गोळी लागून मृत्यू झाल्यास सर्वसाधारणपणे तो विम्याच्या कक्षेत येतो.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात झाला तर त्याला विमा पॉलिसी सोबतची अतिरिक्त रक्कम असते ती मिळत नाही. समजा एखाद्या व्यक्तीनं 50 लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. दुर्घटना झाल्यास 10 रुपयांचा विमा असतो. जर संबंधित व्यक्तीचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात झाल्यास कुटुंबाला 50 लाख रुपयांच्या विम्यानुसार पैसे मिळतील. दुर्घटनेसाठी जी 10 लाखांची तरतूद असते त्याचा लाभ मिळणार नाही. न्यू इंडिया इन्शूरन्सनं अनेक कंपन्यांच्या सहकार्य दहशतवादी हल्ल्यतील मृत्यूच्या कारणाचा समावेश पॉलिसीत केला आहे.

काही विमा कंपन्या जीवन विमा पॉलिसीत दहशतवाद देखील कव्हर करतात. याशिवाय आरोग्य विमा, घर आणि संपत्तीचा विमा याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. दहशतवादी हल्ल्यात घराचं नुकसान झालं, गाडीचं नुकसान झालं तर विमा काढलेला असल्यास क्लेम केल्यास रक्कम मिळते. मात्र, विमा पॉलिसी घेत असताना संबंधित व्यक्तीनं विमा कंपनींच्या नियमांचं वाचन बारकाईनं करुन ते समजून घेणं आवश्यक आहे.

इतर बातम्या :

खिशात नाही दाणा अन् बाजीराव म्हणा! 84 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली, काय आहे पाकिस्तानचं खरं आर्थिक वास्तव

PM Modi Pakistan: पंतप्रधान मोदींच्या पाच वाक्यांनी पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप, मॉनेटरी स्ट्राईकमुळे निर्देशांक 2500 अंकांनी कोसळला

सिंधू पाणी करार स्थगित करताच पाकिस्तानी मंत्री भारतावर संतापले, भ्याड,अपरिपक्व,अन्यायकारक, कोण काय म्हणाले?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.