Ulhasnagar News: दहशतवादाचा निषेध; उल्हासनगरात कँडल मार्च आणि घोषणा, शिवाजी चौकात देशभक्तीचा उद्रेक!
esakal April 25, 2025 03:45 AM

Ulhasnagar : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात उल्हासनगरातील सर्वपक्षीय एकवटले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक पाकिस्तान विरोधी घोषणांनी दणाणून गेला.

या आंदोलनात भाजपाचे आमदार कुमार आयलानी,माजी जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी,शिवसेना उबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे,उपशहरप्रमुख दिलीप मिश्रा,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मनोज लासी,कमलेश निकम,सुमित चक्रवर्ती,नरेंद्रकुमारी ठाकूर,शिवाजी रगडे,काँग्रेसचे रोहित साळवे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बंडू देशमुख,संजय घुगे,मैनुद्दीन शेख,शैलेश पांडव,दिनेश शेटपलानी,पीआरपीचे प्रमोद टाले आदी उपस्थित होते.

बुधवारी रात्री रस्त्यावर उतरलेल्या उल्हासनगरातील शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.तसेच पक्षनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश द्यावेत आम्ही बॉर्डरवर जाण्यासाठी तयार असल्याचा एल्गार केला.यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत निषेध केला.तसेच भारतीय जनता पक्षाने कँडल मार्चद्वारे मृतकाना श्रद्धांजली अर्पण केली.

कॅम्प नंबर 5 च्या बस स्टॉप चौकात शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विजय पाटील यांनी आंदोलन केले.तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात आंदोलनात सर्व माजी पदाधिकारी,महिला आघाडी,युवासेना सहभागी झाले होते.

भाजपाच्या वतीने आमदार कुमार आयलानी,जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आदींनी कँडल मार्चद्वारे मृतकाना श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेनेने हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.