आंबा फळांचा राजा! पण कोण आहे फळांची राणी?
esakal April 26, 2025 05:45 AM
फळांचा राजा

आंबा हा फळांचा राजा आहे, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, कोण आहे फळांची राणी? चला तर मग, जाणून घेऊया या खास राणीबद्दल...

उन्हाळा आला की

उन्हाळा आला की सगळ्यांना लागते ती आंब्याची चविष्ट आठवण! लहान असो वा मोठे, सगळेच आंबा आवडीने खातात. म्हणूनच आंब्याला “फळांचा राजा” म्हटलं जातं.

फळांची राणी

पण “फळांची राणी” कोण आहे, हे तुलनेने फारच थोड्या लोकांना माहिती असतं – ती म्हणजे मँगोस्टीन!

मँगोस्टीन

मँगोस्टीन प्रामुख्याने थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आढळते आणि इथं त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे, मँगोस्टीन हे थायलंडचे राष्ट्रीय फळ देखील आहे.

रंग

या फळाचा रंग गडद जांभळा असतो, आणि आतला गर गोडसर व किंचित आंबटसर असतो.

मँगोस्टीनच्या बिया

मँगोस्टीनच्या बिया थोड्या कडवट असल्या, तरी त्याचा गर अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो. त्यामुळेच हिला “फळांची राणी” म्हटले जाते.

आरोग्यासाठी फायदेशीर

यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. हे फळ केवळ चवीलाच नव्हे, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कॅन्सर, हृदयविकार, सर्दी-खोकला अशा आजारांमध्ये याचे सेवन उपयुक्त ठरते.

सोलकढी पिण्याचे 'हे' 5 फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.