डोंबिवली : पहालगाम येथील हल्ला हा देशावर झालेला हा आघात आहे. देशाच्या नेतृत्वामध्येएअर फोर्स, नेव्ही, मिलिटरी या सर्व यंत्रणा सतर्क आहेत. निश्चितपणे या गोष्टीचा, पाकिस्ताचा बदला घेतल्याशिवाय येथील जनता राहणार नाही अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवली येथे दिला.
पहलगाम हल्ल्यात डोंबिवली मधील संजय लेले, हेमंत नाईक, अतुल मोने या तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची भेट शुक्रवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानच्या नागरिकांना परत जाण्यास सांगितले आहे, यावर मंत्री गणेश नाईक म्हणाले, पाकिस्तानचे जे नागरिक आहेत त्यांना व्हीजा देऊन आपल्या देशाच्या नेतृत्वांने, सिस्टीम ने इशारा दिला आहे की तुम्ही देश सोडून जा. आणि आपल्या देशातले जे नागरिक पाकिस्तानमध्ये कामानिमित्त गेलेले आहेत त्यांना सुद्धा परत देशात परतण्याचे सांगण्यात आले आहे. निश्चितपणे देशाच्या नेतृत्वामध्ये आणि संपूर्ण एअर फोर्स, नेव्ही, मिलिटरी या सर्व यंत्रणा सतर्क आहेत आणि निश्चितपणे या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय येथील जनता राहणार नाही असे ते म्हणाले.
कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली यावर मंत्री नाईक म्हणाले, प्रश्न असा आहे की कुटुंबावर आघात तर झाला, परंतु हा देशावर झालेला आघात आहे. निश्चितपणे या अतिशय अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देशाच नेतृत्व सजा दिल्याशिवाय राहणार नाही. त्या सजा देण्याच्या पाठीमागे देशातल्या सर्व जनतेच्या भावना एकवटल्या आहेत. मी आता त्यांना सांगितले आहे की व्यक्तिगत जीवनामध्ये सहानुभूती आम्ही दाखवू शकतो, परंतु गेलेला जीव तर परत आपण आणू शकत नाही. परंतु यांच्या मृत्यूनंतर जो प्रक्षोभ देशामध्ये उसळलेला आहे एकूणच जे वातावरण झाले आहे देशांमध्ये निश्चितपणे भविष्य काळामध्ये अशा दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवला जाईल.
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे हिंदू मुस्लिम वेगवेगळे करून गोळ्या मारल्या हे सत्य आहे की नाही हे मला माहित नाही असं वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना गणेश नाईक यांनी याबाबतीत मला वक्तव्य करायचं नाही. मात्र प्रश्न असा आहे की तिथे विचारून विचारून मारलं त्यांचं धार्मिक कोणत्या रिलेशन या सगळ्या गोष्टी बघूनच हे सगळं झालं. हे सगळं उघड झाले त्यावर कोणी कॉमेंट करायची गरज नाही.
कॉंग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस हे टीका करतात याबाबत बोलताना गणेश नाईक यांनी याबाबतीत कोणी राजकारण करू नये. आपल्या देशातले नागरिक मृत्युमुखी पडले. अमानुषपणे त्यांना मारण्यात आलं निर्दोष लोकांची हत्या झाली या सर्व गोष्टींचा निषेध केला पाहिजे. आणि सर्व देश या भावनेच्या पाठीमागे एकवटला पाहिजे असे म्हणाले.