Makarand Anaspure: जगातील सर्व दहशतवाद्यांना तुझ्याकडे बोलव...; मराठी अभिनेत्याचे देवाकडे साकडं
Saam TV April 26, 2025 05:45 PM

पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. प्रत्येक क्षेत्रातून पहलगाम हल्ल्याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक कलाकारांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, आता ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीदेखील पहलगाम हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांच्या धर्माविषयीच्या कल्पना या काढून टाकायला हव्यात, असं त्यांनी म्हटलं आहे.

मकरंद अनासपुरे यांनी मावळमध्ये एका कार्यक्रमात महत्त्वाचा वक्तव्य केलं आहे. यावेळी आमदार सुनील शेळकेदेखील तिथेच उपस्थित होते. मकरंद अनासपुरे म्हणाले की, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला त्यासह जगभरातील सर्व भ्याड अतिरेकी आहे, त्यांना ईश्वराने त्यांच्याकडे बोलावून घ्यावे.दहशतवाद्यांच्या धर्माविषयी कल्पना काढून टाकून त्यांचा ब्रेन वॉश करून माणूस म्हणून परत पाठवावे असे ईश्वराला साकळ घालतो असे अनासपुरे म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याचसोबत यांनी नाट्यगृहाबाबतही वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणींनाच नाट्यगृह हवं आहे, असं अजित दादांना सांगा म्हणजे लवकर निधी मिळेल, कारण सुनील शेळके हे अजित दादांच्या जवळचे मानले जातात, अशी मिश्कील टिप्पीदेखील मकरंद अनासपुरे यांनी केली.

मधील हल्ला हा खूप जास्त भयावह होता. २८ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पहलगाममधील या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता प्रसाद खांडेकर, तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, पुष्कर जोग यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.