बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आज ४४ व्या वर्षी पदार्पण केलं. तिचा चाहता वर्ग आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. सनी लिओनीने जिस्म २ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. याआधी ती अडल्ड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होती. मुळची कॅनडातील रहिवासी सनीचं खरं नाव करणजीत कौर असं आहे. पंजाबी सिख कुटुंबात तिचा जन्म झाला. सनीनं आपला खडतर प्रवास आपल्या वेबसिरीजमधून मांडला. त्यात तिने अनेक खुलासे केले आहेत.
करणजीत कौर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी, असे वेबसिरीजचे नाव आहे. या वेबसिरीजमध्ये तिने स्वत:ची भूमिका साकारली. या वेबसिरीजमध्ये तिने अनेक खुलासे केले. या वेबसिरीजमध्ये एक सीन आहे, यामुळे घरात मोठा गोंधळ झाला असल्याचं तिने सांगितलं होतं.
'शाळेत असताना माझा एक बॉयफ्रेंड होता. बॉयफ्रेंडला किस करताना माझ्या वडिलांनी पाहिलं. यानंतर ते थेट घरी गेले. मी देखील घरी गेले. घरी गेल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता', असं सनीने सांगितलं.
भारतात सनीला खरी ओळख बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे मिळाली होती. २०११ साली तिने या शोमध्ये भाग घेतला होता. या शो दरम्यान महेश भट्ट यांनी तिला एका चित्रपटासाठी साइन केलं होतं. जिस्म २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सनी लिओनी प्रकाशझोतात आली.
यानंतर सनीने मागे वळून पाहिलं नाही. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केलं. तसेच तिने अनेक अल्बमसाठीही काम केलं. सनी सध्या बॉलिवूड अभिनेत्री नाही तर, एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. सनी सोशल मीडियात प्रचंड सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.