Ata Thambaycha Naay: 'आता थांबायचं नाय' चित्रपटाने रचला इतिहास; दुसऱ्या आठवड्यातही मराठी चित्रपटाला लागले हाऊसफुल्लचे बोर्ड
Saam TV May 14, 2025 12:45 AM

Ata Thambaycha Naay: ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात इतकं खोलवर घर केलं आहे की, पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात लोकांचा प्रतिसाद अक्षरशः उस्फुर्त ठरला . तिकीटांची मागणी दुपटीने वाढली आणि महाराष्ट्रभर थिएटरमध्ये आता सलग हाऊसफुल्ल शो पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचं वादळ उठलंय, वणवा पेटलाय आणि तो वणवा फक्त पडद्यावर नाही, तर प्रेक्षकांच्या भावना, अभिमान आणि अंतर्मनात झगमगतोय.थिएटरबाहेरचे हाऊसफुल्ल बोर्ड, खिडकीवरच्या रांगा, आणि चित्रपट संपल्यानंतर उभं राहून टाळ्या वाजवणारे प्रेक्षक हेच सांगून जातात की हा चित्रपट फक्त डोळ्यांनी नाही, तर मनाने पाहिला जातो.

अर्थात मराठी प्रेक्षक चोखंदळ आहेत. जेव्हा त्यांच्या हृदयाला भिडणारी गोष्ट समोर येते, तेव्हा ती ते मनापासून स्वीकारतात. ‘’ ही गोष्ट त्यांनी आपलीशी केली आहे.अनेकांनी एकदा पाहिल्यानंतर घरच्यांना घेऊन पुन्हा थिएटर गाठलं. सोशल मीडियावर सतत दिसणारं एकच वाक्य “हा अनुभव घ्यायलाच हवा.”चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षक स्तब्ध होतात. डोळे पुसतात… आणि एकमेकांना म्हणतात, “खूप दिवसांनी काहीतरी खरं पाहिलं.”

सोशल मीडियावरही सगळीकडे हा अनुभवच फिरतोय स्टेटस, पोस्ट, स्टोरी… सगळीकडे लोक स्वतःहून लिहून सांगतायत, “हा सिनेमा अनुभवायलाच हवा.” या चित्रपटाचं कौतुक केवळ सामान्य प्रेक्षकांनी नाही, तर मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी सुद्धा केलं आहे. नागराज मंजुळे म्हणतात, “चांगला चित्रपट कसा असतो तर असा असतो.” डॉ .सलील कुलकर्णी म्हणतात, “धगधगीत माणूसपणाचा… एकमेकांना जपणाऱ्या भल्या माणसांचा चित्रपट!” मुक्ता बर्वे म्हणतात, “ज्यांच्या खऱ्या आयुष्यावर ही गोष्ट उभी राहिलीय, त्यांच्या जिद्दीला सलाम.”

या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केलं असून, हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. पण त्यांनी ज्या समजुदारीने ही भावना सादर केली आहे, ती प्रेक्षकांच्या काळजाला भिडते. चित्रपटाची निर्मिती केली आहे झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांनी. या चित्रपटात , सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, श्रीकांत यादव, किरण खोजे, दीपक शिर्के, प्रवीण डाळिंबकर, रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर यांचा अभिनय इतका खरा आहे, की प्रेक्षक त्या पात्रांशी नकळत जोडले जातात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.