सध्या बॉक्स ऑफिसवर दोन मराठी चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देताना पाहायला मिळत आहे. काल (25 एप्रिलला) 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट रिलीज झाला तर दुसरीकडे अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांचा 'देवमाणूस' (Devmanus ) चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटांनी पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.
सूरजच्या 'झुपूक' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्श ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातून सूरज पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'झापुक झुपूक' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ग्रॉस कलेक्शन 27 लाख रुपये केली आहे. चित्रपटाने यशस्वी सुरूवात केली आहे. तर 'झापुक झुपूक' चित्रपटाचे नेट कलेक्शन 24 लाख रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली आहे.
'देवमाणूस' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1मराठी दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर यांचा 'देवमाणूस' चित्रपट देखील रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'देवमाणूस' चित्रपटाची पहिल्या दिवशी ग्रॉस कमाई 15 लाख रुपये झाली असून नेट कलेक्शन 14 लाख रुपये झाले आहे. सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाने महेश मांजरेकर यांच्या '' चित्रपटाला मागे टाकले आहे. वीकेंडला हे चित्रपट काय धुमाकूळ घालतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'देवमाणूस' चित्रपटात रहस्य, गूढ भावनांनी भरलेला कथा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा आणि विजय देऊस्कर यांनी केले आहे. तर 'झापूक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेंनी केले आहे. सूरज चव्हाणचा 'झापूक झुपूक' चित्रपट ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात सूरजसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहे.