भारताला ताकही फूंकुन प्यावे लागणार, पहलगाम हल्ल्यामागे ही मोठी चाल, खरा शत्रू तर .
GH News April 27, 2025 12:07 PM

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर स्ट्रॅटजिक पावले उचलली हेच योग्य आहे. कारण जर थेट हल्ला केला असता तर पाकिस्तानला ते हवेच होते. कारण भारताने आततायी होऊन हल्ला करावा हाच पहलगाम हल्लामागचा हेतू होता असे आता स्ट्रॅटजिक एक्सपर्ट बोलत आहेत. काय आहे या पहलगाम हल्ल्यामागचा हेतू ?  काय म्हणतायत एक्सपर्ट पाहा…

पाकिस्तान आपल्या देशाशी कधीही युद्ध न करता कायम प्रॉक्सी वॉर या तंत्राचा वापर करत आला आहे. त्यासाठी मुस्लीम बहुल कश्मीराचा पाकिस्तान नेहमीच वापर करीत आला आहे. काश्मिरमध्ये आता काही दिवसात देशाच्या उर्वरित भागाशी कश्मीर रेल्वेने जोडले जात असतानाच नेमका पहलगामवर हल्ला केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला थेट युद्ध सुरु न करता केवळ दबाव निर्माण केल्याने पाकिस्तानची तंतरली आहे.

आपण पाकिस्तान मिळणारे सिंधुनदीचे ६० टक्के पाणी अडवून पाकिस्तानचे नाक बंद करुन त्याच्या बुक्क्यांचा मारा सुरु केला आहे. पाकिस्तानने कितीही आव आणला तरी भारतीय सैन्याच्या अचाट जिद्दीपुढे त्यांचे सैन्य नाकाम आहे हे आजवरच्या चार युद्धाने तोंड फोडून घेतलेल्या पाकिस्तानला पक्के ठावूक आहे. पाकिस्तानने मुद्दामहून चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाच्या तोंडावर हा हल्ला केला आहे.कारण एकदा काश्मीराला उर्वरित देशाशी रेल्वेने जोडले की काश्मीरचा विकास वेगाने सुरु होणार आहे.

काश्मीरातील बेकार तरुणांना धर्माच्या नावाने भडकायचे पाकिस्तानचे धंदे मग थंड पडणार आहेत. मग पाकच्या उन्मादी जनतेला,तेथील बेकारीला कोणताही विकास कार्यक्रम नसताना कसे तोंड देणार यात हा देश १०० टक्के कोलमडून पडण्याचा धोका आहे. त्यामुळेच अस्थिरता आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या फाटक्या देशाने सार्वभौम ताकदवान देशाच्या गंडस्थळावर हल्ला करण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.

आजवर पाकिस्तान अमेरिकेने फेकलेल्या तुकड्यांवर जगत होता. पण आता पाकिस्तानचा काश्मिरमधील इश्यू जीवंत आणि धगधगत ठेवण्यातच अमेरिका, रशिया, चीन या मोठ्या देशांचे हित गुंतलेले होते. आताही पाकिस्ताने त्याच्या वाट्यातील पीओकेची जमीन चीनला आंदण दिली आहे. ही भूमी भारतावर कायम स्वरुपी चीनचा दबाव टाकण्यासाठीचे पाकिस्तानने दिलेली आहे. ‘द प्रिंट’ मध्ये स्ट्रॅटजिक एक्सपर्ट स्वाती राव यांनी एक लेख लिहीला आहे. त्यात त्यांनी या हल्लामागे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचे म्हटले आहे.

भारतीय सैन्य पाकिस्तानला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची तयारी करीत आहे. पण त्याआधीच भारताने पाकची कोंडी करण्यास हळूहळु सुरुवात केली आहे. सिंधु करार सस्पेंड करणे,व्हीसा बंदी, अटारी बॉर्डर बंद करणे आधी उपाय भारताने योजून पाकिस्तानची हवा ताईट करुन टाकली आहे. पण पाकिस्तान कोणाच्या जीवावर उडी मारतो हे पाहूयात..

पाकिस्तानच्या कोणाच्या जीवावर उड्या ?

पाकिस्तानच्या वायू सेनेने अलिकडे चीनशी करार करुन आपली क्षमता वाढविली आहे. चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला मोठी मदत केली आहे. शी ज‍िनपिंगचा देश चीन लागोपाठ शस्रास्र पुरवित आला आहे.तुर्कस्थान हा इस्लामी देश वेगाने पाचव्या पिढीचे स्टील्थ ( रडारवर अजिबात न दिसणारे ) फायटर जेट विमान विकसित करीत आहे. चीन आधीच अशी स्टील्थ विमाने विकसित केली असून ती पाकिस्तानला दिलेली आहे. भारताकडे मात्र सध्याच्या घडीला पाचव्या पिढीचे स्टील्थ विमान नाही. भारताची वायू सेना विमानाच्या टंचाईने त्रस्त आहे. पाकिस्तानने चीनला या बदल्यात भारताला अडचण होईल असे स्ट्रॅटेजिक लाभाचे शक्सगाम खोरे अनेक दशकांपूर्वीच चीनला आंदण दिले आहे.त्यामुळे बीजिंगला भारतावर अतिरिक्त दबाव गट तयार करण्याची संधी मिळाली आहे.

या नव्या इस्लामिक ताकदीची पाकला खिरापत

चीनच्या शस्रास्रांच्या क्वालिटीवर नेहमीच संशय असला तरी चीनने स्टील्थ विमानाचे तंत्रज्ञान चोरुन लपून तयार करण्यात यश मिळविलेच आहे ही बाब नाकारता येणार नाही. फायटर जेट एफसी-२१ ला अनेक एक्सपर्ट्सने बेकार ठरवले आहे. तसेच २०२१ मध्येच चीनने पाकिस्तानला मोठ्या डीस्काऊंटने पानबुड्या दिल्या आहेत.त्यातील ऑपरेशनल स्टँडर्डवर कुचकामी ठरल्या आहेत. परंतू भारताला खरी चिंता तुर्कीची आहे.तुर्कीने ‘आशिया एन्यू इनिशिएटिव्ह’चे अंतर्गत इस्लामच्या नावाखाली भारताच्या शेजारील इस्लामिक देशांशी संबंध मजबूत करायला सुरुवात केली आहे. तुर्कस्तानने पाकिस्तानला अनेक शस्त्रे दिली आहेत. त्याला इस्लामिक टच असतो आणि जिहादाची फोडणी दिलेली असते..त्यामुळे एक नाकाम आणि दिवाळखोर राष्ट्र असलेला पाकिस्तान उड्या मारत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.