बदलापूर-सीएसएमटी लोकलमधून गोमांस तस्करीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क लोकल ट्रेनमधून गोमांस तस्करी केली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस तस्करी करणाऱ्या तिघांना पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी कल्याण पोलिस तपास करत आहेत.
-सीएसएमटी लोकलमधून गोमांस तस्करी केली जात असल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ तिघांना पकडून कल्याण रेल्वे स्थानकावर उतरवलं आणि त्यांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. कल्याण रेल्वे पोलिसांनी या तिघांकडे असलेले गोमांस जप्त केले. या घटनेनंतर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
गोमांसाची तस्करी करणाऱ्या तिघांकडून रेल्वे पोलिसांनी तब्बल १२ किलो गोमांस ताब्यात घेतले आहे. या तिघांची पोलिस चौकशी करत आहेत. हे गोमांस कुठून आणले? हे गोमांस कोणाला द्यायला चालले होते? याचा कल्याण रेल्वे पोलिस तपास करत आहेत. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.