महुडे, ता.२७ : नांदगाव (ता.भोर) येथील रोहित्रावरील विद्युतवाहक तारांच्या शॉट सर्किटमुळे रोहित्राखालील पाला पाचोळ्यासह गवताला आग लागली. रोहित्राच्या तारा जळून रोहित्राचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (ता.२६) दुपारी घडली आहे.
नांदगाव हद्दीत अनेक खांब जीर्ण झाले असून १९८० पासून ४० वर्ष झाले विजेचे खांब बदलले नाहीत. ग्रामपंचायतीकडून जानेवारी २०२४ मध्ये पोल बदलण्याची मागणी करूनही आजतागायत खांब बदलण्यात आले नाहीत. चऱ्हाटवाडी येथेही विद्युत वाहक तारांना ताण राहिला नसल्याने तारा लोंबकळत असून, यापासून मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वायरमन चांगले काम करतात परंतु महावितरणचे अधिकारी गेल्या वर्षभरापासून दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटना होत असल्याचे सरपंच भाग्यश्री गणेश चऱ्हाटे यांनी सांगितले.
01774